Home /News /agriculture /

'या' स्टेप्सच्या माध्यमातून ऑनलाइन पाहता येईल PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांची स्थिती

'या' स्टेप्सच्या माध्यमातून ऑनलाइन पाहता येईल PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांची स्थिती

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) भाग असलेले शेतकरी, सरकारच्या अधिकृत पीएम किसान पोर्टलवर शेतकरी कॉर्नरद्वारे लाभार्थी स्थिती तपासू शकतात.

    नवी दिल्ली, 19 एप्रिल : केंद्र सरकार येत्या काही आठवड्यांमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana) अर्थात पीएम किसान (PM-Kisan) योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या योजनेतून 2000 रुपयांचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लवकरच वर्ग केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या योजनेतून पात्र शेतकरी कुटुंबाला दर चार महिन्यांनी 2000 रुपये याप्रमाणे वर्षाला 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या सरकारी समर्थित पेन्शन योजनांपैकी (Pension Scheme) एक आहे. आर्थिक मदतीची गरज असलेल्या शेतकरी कुटुंबांना (Farmers Family) पाठबळ देण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये या योजनेस हिरवा कंदील दाखवला. पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आतापर्यंत 1.57 लाख कोटी रुपयांवर निधी दिला आहे. सरकारने पीएम किसान योजने अंतर्गत 10 वा हप्ता यापूर्वीच वर्ग केला आहे. याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळाला आहे. ज्या शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतीत पाहण्यासाठी उपलब्ध असते. योजनेत पारदर्शकता राहावी, यासाठी ही माहिती पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येते. याशिवाय या योजनेत समाविष्ट असलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित शेतकरी कुटुंबांना निधी मंजूर झाल्याची सूचना ऑफिशियल सिस्टीम जनरेटेड एसएमएसद्वारे (SMS) देणं बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेत सहभागी शेतकरी सरकारच्या अधिकृत पीएम किसान पोर्टलवरील `फार्मर्स कॉर्नर`वर (Farmers Corner) जाऊन लाभार्थी स्थिती तपासू शकतात. चिल्लरवर डल्ला! SBI च्या तिजोरीतून गायब झालेल्या 11 कोटींच्या नाण्यांच्या चोरी, चौकशी सुरु अशी तपासता येते पीएम किसान योजनेतील लाभार्थी स्थिती 1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे. 2. होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला `फार्मर्स कॉर्नर` नावाचा स्वतंत्र सेक्शन दिसेल. 3. फार्मर्स कॉर्नरमध्ये गेल्यावर तुम्हाला बेनिफिशयरी स्टेट्स (Beneficiary status) असा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. 4. याशिवाय तुम्ही थेट https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या लिंकचादेखील वापर करू शकता. 5. तुम्ही बेनिफिशयरी स्टेट्समध्ये आल्यानंतर आधार क्रमांक, पीएम किसान खाते क्रमांक किंवा तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यापैकी एक रकान्यात भरावा. 6. माहितीचा तपशीला भरल्यानंतर `Get Data` या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेट्स अर्थात लाभार्थी स्थिती दिसेल. पीएम किसान योजनेसाठीचे पात्रता निकष कोणत्याही सरकारी योजनेसाठी काही विशिष्ट पात्रता निकष असतात. या निकषांच्या आधारे योजनेचा लाभ दिला जातो. त्यानुसार, पीएम किसान योजनेसाठी भारतीय नागरिक असलेले अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत. याशिवाय सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबं, ज्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन आहे, ते या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात 2000 रुपये केले जाणार आहेत.
    First published:

    Tags: PM Kisan, Pm modi

    पुढील बातम्या