Home /News /agriculture /

raju shetti : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले, प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, राजू शेट्टींची खरमरीत टीका

raju shetti : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले, प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, राजू शेट्टींची खरमरीत टीका

सरकार कोणाचेही येवो 13 जुलैला जिल्हाधिकारी (Kolhapur collector office) कार्यालयार विराट मोर्चा काढू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांनी दिला.

  मुंबई, 25 जून : नियमित कर्जफेड (crop loan) करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) द्याव्या लागणाऱ्या 50 हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानासाठी १० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात (budget) करण्यात येऊनही विविध निकष लावून शेतकऱ्यांची जणू क्रूर चेष्टा केली जात आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदानाचा निर्णय येत्या (Punjabrao Deshmukh Interest Concession) आठवड्याभरात घ्या अन्यथा सरकार कोणाचेही येवो 13 जुलैला जिल्हाधिकारी (Kolhapur collector office) कार्यालयार विराट मोर्चा काढू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme 2019) अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे.\

  हे ही वाचा : 'मातोश्री'त सत्ताकेंद्र, पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, उद्या मोठा निर्णय होणार?

  मात्र, हे अनुदान देत असताना लावलेल्या अटींवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पोलखोल केली आहे. त्यामुळे 13 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

  राजू शेट्टी पुढे म्हणाले की, या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण ही सरळ सरळ अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे, त्यांना हे अनुदान मिळणार नाही अस हे परिपत्रक सांगत आहे. नियमित कर्ज भरणारे 95 टक्के शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पण हेच शेतकरी या मध्ये पात्र होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.

  ज्यांना 2019 ला नुकसान झालं म्हणून लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न मिळण्याची आत घालण्यात आली आहे.

  हे ही वाचा : 'मी मागून वार करणारा नाही'; आमदारांच्या बंडामागे हात असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

  शेट्टी काय म्हणाले

   ऊस शेती ही 15 ते 18 महिन्याच पीक आहे. शासनाचा नियम असा आहे की सलग तीन वर्षे कर्ज काढल्यास या योजनेला पात्र राहील असे निकष आहेत मग 15 ते 18 महिने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबत नियम कसा धरायचा?

  कोल्हापूर जिल्ह्यात 953 कोटी रुपये सरकारच्या नियमानुसार फक्त 104 कोटी मिळणार आहेत

  पण यामध्ये सरकारच्या नियमानुसार फक्त 10 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार मग शेतकऱ्यांना तुम्ही कसले अनुदान दिला. जिल्ह्यात 1 लाख 42 हजार पैकी फक्त 17 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे

  बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का ?

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Raju Shetti, Raju Shetti (Politician)

  पुढील बातम्या