Home /News /agriculture /

satara sugarcane : शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ! पुन्हा ऊस पेटला, 20 महिन्यांनी उसाला तोड आल्याने शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

satara sugarcane : शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ! पुन्हा ऊस पेटला, 20 महिन्यांनी उसाला तोड आल्याने शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

सातारा (satara) जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. ऊस तोडण्यास नकार देणाऱ्या फडकऱ्यांचाही सन्मान केला आहे.

    सातारा, 22 मे : राज्यातील साखर कारखाने (sugar factory) अद्यापही सुरू आहेत ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील (beed farmer suicide) शेतकऱ्यांने उसाला तोड येत नसल्याने तो पेटवून देत शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ही घटना ताजी असताना सातारा (satara district sugarcane farmers) जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे त्या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली.

    साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.

    हे ही वाचा : भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

    गेली 20 महिने ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. दरम्यान बर्गे यांनी राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.

    राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने जवळ असुनही उसाला तोड येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात अद्यापही अद्याप 16 लाख टनापेक्षा जास्त ऊस शिल्लक आहे. हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी  याबाबत माहिती दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

    हे ही वाचा : स्कॅम 1992 च्या यशानंतर 'Scam 2003 The Telgi Story' प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता दिसणार तेलगीच्या भूमिकेत

    सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले.  इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.

    साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा हंगाम जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.

    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Satara, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

    पुढील बातम्या