Home /News /national /

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

CM Bhagwant Mann: अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मॉडेल अंतर्गत, पंजाबच्या भगवंत मान सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आणि त्यांच्या मंत्र्याची हकालपट्टी केली.

    चंदीगड, 24 मे: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) यांनी भ्रष्टाचाराबाबत (corruption) कठोर वृत्ती दाखवत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आपले आरोग्यमंत्री विजय सिंगला (health minister Vijay Singla) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. वृत्तानुसार, विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले (Ministry Post)आहे. अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मॉडेल अंतर्गत, पंजाबच्या भगवंत मान सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आणि त्यांच्या मंत्र्याची हकालपट्टी केली. पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारात गुंतल्याचे भक्कम पुरावे सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री विजय सिंगला हे कंत्राटी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी करत होते. तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना बडतर्फ केले. देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी थेट आपल्या मंत्र्यावर कडक कारवाई केली आहे. भगवंत मान म्हणाले की, लोकांनी खूप अपेक्षा ठेवून आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे, त्या अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. एक टक्काही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान (L) ने रिश्वतखोरी के आरोप में स्वास्थ्य मंत्री विजय सिंगला (R) को अपनी कैबिनेट से बर्खास्त किया. (ANI Photo) मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था उखडून टाकू, आम्ही सर्व त्यांचे सैनिक आहोत, अशी शपथ घेतली होती. 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एका मंत्र्याची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हकालपट्टी केली होती. आज देशात दुसऱ्यांदा असे घडत आहे. विजय सिंगला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी आपली चूक मान्य केली आहे. सिंगला हे प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर डॉ. विजय सिंगला, जे सामान्य डॉक्टरपासून मंत्रीपदापर्यंत पोहोचले, त्यांनी बीडीएसचे शिक्षण राजिंद्र मेडिकल कॉलेज, पटियाला येथून पूर्ण केले. त्यांचे वडील केशोराम सिंगला भूपाल कलान गावात एक छोटेसे किराणा दुकान चालवत होते, ते नंतर मानसा येथे स्थलांतरित झाले. सुमारे 10 वर्षांपूर्वी सिंगला यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि यावेळी त्यांना 'आप'ने मानसा विधानसभेचे तिकीट दिले. डॉ. सिंगला यांनी काँग्रेसचे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला यांचा मानसातून 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: AAP, Health, Panjab

    पुढील बातम्या