सातारा, 12 जून : सातारा जिल्ह्यात (satara district) अद्याप 20 हजार टन ऊस शिल्लक असताना सर्व कारखान्यांनी मात्र गाळप हंगामाची सांगता केली आहे. (sugarcane farming) वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील 20 हजारांवर टन ऊस गाळपाविना उभा आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस (sugarcane) तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे. (farmer) दरम्यान सातारा जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला (sugar factories) जात नसल्याने पेटवून देत त्याचे जळण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकरी निराश (farmer Disappointed) झाले आहेत. सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 20 हजार टन ऊस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांनी कोणाला जाब विचारायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. (Minister of Co-operation)
सातारा जिल्ह्यात 14 साखर कारखाने आहेत यामध्ये काही कारखान्यांनी मे महिन्यापर्यंत गाळप केले. अजिंक्यतारा कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांनी मे महिन्यांच्या सुरुवातीला कारखाने बंद केले. अजिंक्यतारा कारखान्याने ३ जूनअखेर गाळप केले. दरम्यान शिल्लक राहिलेल्या उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने कोणाला जाब विचारायचा हा प्रश्न समोर राहिला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनी जबाबदारी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हे ही वाचा : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय
कारखान्यांनी या हंगामात एक कोटी 25 लाख टनांवर साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊस गाळपाच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक साखरनिर्मिती झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अद्यापही 20हजार टन ऊस शिल्लक राहिला आहे. ऊस उभा असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत जिल्ह्यातील कारखाने बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. किसन वीर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस 'जरंडेश्वर' व 'अजिंक्यतारा' या कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात नेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला.
मात्र, त्यांचेही प्रयत्न तोकडे ठरले आहेत. तरीही अजून 20 हजार टन ऊस शिल्लक आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड कारखान्याला ऊस गाळपास नेला जात आहे. मात्र, या कारखान्यांची क्षमता कमी असल्याने ऊस शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
हे ही वाचा : '1 किलो वजन कमी करा आणि 1000 कोटी मिळवा'; गडकरींचं चॅलेंज स्विकारत खासदाराने घटवलं 15 KG, आता..
सातारा जिल्ह्यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोन मंत्री असतानाही जिल्ह्यात शिल्लक उसाचे नियोजन केले गेले नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे नियोजन अगोदर करणे गरजेचे होते. कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाबाबत कसलाही विचार न करता जिल्ह्यातील कारखान्यांनी हंगामाची सांगता केली. त्यामुळे शिल्लक राहणान्या उसाची जबाबदारी दोन्ही मंत्र्यांसह सर्वांनीच झटकली असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Satara, Satara news, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane Production