जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Business Idea: काळ्या हळदीची शेती करा, किलोला 1000 रुपये कमवून मालामाल व्हा

Business Idea: काळ्या हळदीची शेती करा, किलोला 1000 रुपये कमवून मालामाल व्हा

Business Idea: काळ्या हळदीची शेती करा, किलोला 1000 रुपये कमवून मालामाल व्हा

सर्वसाधारण पिवळ्या हळदीला प्रतिकिलो 60 ते 100 रुपये इतका भाव मिळतो. तर काळ्या हळदीला मात्र 800 ते 1000 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळू शकतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    दिल्ली, 29 एप्रिल: शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे की तोट्याचा यावर अनेकदा वाद होत असतात. पण जर तुमची शेती असेल आणि तुम्हाला शेतीमधून भरपूर उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यासाठी एक अफलातून नवीन कल्पना आहे. या शेतीमधून तुमची अगदी थोड्या काळात भरपूर कमाई होऊ शकते. काळ्या हळदीची शेती (Black Turmeric Farming) केल्यास भरपूर उत्पन्न अगदी अल्पावधीतच मिळू शकतं. मनीकंट्रोलवर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. काळी हळद अत्यंत औषधी मानली जाते. अत्यंत महागड्या औषधी उत्पादनांमध्ये काळ्या हळदीचा समावेश होतो. काळ्या हळदीत अनेक औषधी गुण (Medicinal Benefits of Black Turmeric) असल्यामुळे त्याची किंमतही भरपूर (Price of Black Turmeric) असते.

    तापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश

    सर्वसाधारण पिवळ्या हळदीला प्रतिकिलो 60 ते 100 रुपये इतका भाव मिळतो. तर काळ्या हळदीला मात्र 800 ते 1000 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळू शकतो. सध्या काळी हळद अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्याला मागणी मात्र भरपूर आहे हे महत्त्वाचं. कोविडनंतर काळ्या हळदीला जास्त मागणी आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी बूस्टर (Immunity Booster) म्हणूनही याचा उपयोग केला जातो. काळी हळद त्याच्या विशेष औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेदिक, (Ayurwedic) होमिओपॅथी (Homeopathy) आणि अन्य अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये काळ्या हळदीचा वापर केला जातो.

    सहसा जून महिन्यात काळ्या हळदीची शेती(Black Turmeric Farming) केली जाते. भुरभुरीत चिकणमातीत काळ्या हळदीचं उत्पादन चांगलं येतं. मात्र काळ्या हळदीचं उत्पादन घेताना शेतात पावसाचं पाणी साठून राहणार नाही याकडे अवश्य लक्ष द्या. एक हेक्टरमध्ये काळ्या हळदीचं जवळपास 2 क्विंटल बी पेरलं जातं. या शेतीसाठी जास्त सिंचनाचीही गरज नाही. हळद मुळातच औषधी असल्याने यामध्ये कीड लागत नाही. त्यामुळे कीटकनाशकाचीही गरज नसते. अर्थात चांगल्या आणि भरपूर उत्पादनासाठी शेती करण्याआधीच योग्य प्रमाणात शेणखत घातलं तर भरघोस उत्पादन हमखास मिळू शकतं. एका एकरामध्ये काळ्या हळदीचं पीक घेतल्यास त्यातून जवळपास 50-60 क्विंटल हळद म्हणजेच जवळपास 12-15 क्विंटल कोरडी हळद सहज मिळते. काळ्या हळदीच्या शेतीतून उत्पादन जरी कमी मिळालं तरी त्यातून मिळणारं उत्पन्न म्हणजेच कमाई मात्र भरपूर असते. ही काळी हळद 500 रुपयांपर्यंत अगदी सहजपणे विकली जाते. अनेक शेतकऱ्यांनी तर काळी हळद 4000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतही विकली आहे.

    अखेर प्रशांत किशोर यांनी केला काँग्रेसला दिलेल्या फॉर्म्युल्याचा खुलासा, म्हणाले…

    अनेक ऑनलाईन वेबसाईट्सवर काळी हळद 500 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत विकली जाते. तुम्ही अगदी 500 रुपयांच्या हिशेबाने जरी हळद विकली तरी तुम्हाला 15 क्विंटलमधून 7.5 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. आणि तुमची हळद जर 4000 रुपये किलोने विकली गेली तर मग तुम्ही अगदी घरबसल्या मालामाल होऊ शकता.

    काळ्या हळदीच्या शेतीसाठी अगदी पूर्णपणे नीट माहिती करून घेतली आणि त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर थोड्याशा उत्पादनातून भरघोस कमाई होऊ शकेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात