नागपूर, 26 जानेवारी : नागपुरातील रामटेक व त्या क्षेत्रातील परिघात असंख्य पौरााणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ आहेत. वर्षाकाठी लाखो भाविक आणि पर्यटक रामटेकमध्ये येतात. सध्या रामटेक- तुमसर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी मनसर येथील शेकडो अर्जुन वृक्ष कापण्यात येणार होते. परंतु, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी या वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता हे वृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार घेतला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या वृक्षांचे महत्त्व समजावून सांगितले. यावर गडकरी यांनीही भावना समजून घेत एकही वृक्ष तुटणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय कल्पकतेने एकही वृक्ष तुटणार नाही आणि रस्त्याचे कामही पूर्ण करून दाखविले. आज या रस्त्यावरील सर्व अर्जुन वृक्ष सुरक्षित आहेत.
300 झाडं वाचवली
रामटेक आणि रामटेकच्या जवळ अनेक पर्यटन आणि धार्मिक वारसा स्थळ स्थित आहे. त्यामुळे लाखो पर्यटक आणि भाविक येथे येत असून या मार्गावर कायम वर्दळ राहते. सदर बाब लक्षात घेता या भागाच्या विकासाच्या अनुषंगाने रामटेक- तुमसर या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम सुरू आहे. या महामार्गावर तुमसर नजीक दुतर्फा 300 च्या जवळपास अर्जुन वृक्ष आहेत.
Photos : थंडीचं वातावरण फुलांनी करा प्रसन्न, पुष्पप्रदर्शनाचा घ्या फ्रेश अनुभव
5 वृक्ष कापल्याचा आघात
सुरुवातीला रस्त्याच्या बांधकामात नागार्जुन टेकडीखाली असलेले पाच वृक्ष कापण्यातही आले. या प्रकारामुळे प्रचंड आघात झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली 40 ते 50 फूट उंचीच्या वृक्षांची कत्तल होईल, अशी भीती होती. सदर बाब लक्षात घेता दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी या वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता हे वृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडेच इंदोरा बुद्ध विहार येथील निवासस्थानी भदंत ससाई यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.