बुरहानपूर, 21 मे : मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील (Madhya Pradesh) रहिवासी असलेल्या तुषार नेमाडे यांनी इंजीनियरिंगचे शिक्षण (engineer) पूर्ण केल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये डिझाईनींग इंजीनियर (designing engineer) या पदावर काम केले. दरम्यान त्यांना नोकरी (job) न करता स्वत:चा व्यवसाय करायचा होता. यावेळी त्यांच्या ओळखीच्या एका पशुवैद्यकीय डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत तुषार यांनी शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून तुषार यांनी क्रांती केली आहे. ते स्वत: या व्यवसायातून लाखो रुपये कमवतात याचबरोबर ते काही मुलांनाही याची शिकवण देत आहेत. (Goat Farming)
तुषार यांनी याची सुरूवात कशी केली याबाबत ते म्हणतात की, शेळीपालन हा व्यवसाय मी 27 एकरात केला आहे. शेळ्यांना राहण्यासाठी सुसज्ज सेड नेट बांधण्यात आले आहे. माझी भेट एका पशुवैद्यकीय डॉक्टरांशी झाली त्यांच्या प्रेरणेने मी व्हेटर्नरीमध्ये डिप्लोमा केला आणि शेळीपालनाचा व्यवसाय सूरू केला. शेळीपालन सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर 6 महिन्यांसाठी एक छोटासा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर 1000 ते 1200 क्षमतेचे शेळीपालन केंद्र उभारण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर काही लोक माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.
हे ही वाचा : Weather Forecast : दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार Pre-Monsoon, मुंबई-पुण्यात काय अंदाज?
शेळीपालनामध्ये शेळी-मेंढी आणि त्यांची पिल्लांची देखभाल काळजीपूर्वक करावी लागते. याचबरोबर शेळ्या आणि मेंढ्याचे वर्गीकरण करून त्यांची विक्री करावी लागते. हे काम करताना अतिशय काळजी घ्यावी लागत असल्याचे तुषार सांगतात.
शेळीपालनाचे योग्य तंत्र अवलंबल्यामुळे त्यांच्याकडे वर्षभरात 120 शेळ्या विक्रीसाठी असतात. शेळीचे वजन सरासरी 25 किलो झाल्यास प्रति शेळी 10 ते 12 हजारांना विकली जाते. अशा प्रकारे 100 पिल्ली विकली तर 10 ते 12 लाखांचे उत्पन्न मिळते. यापैकी पालनपोषणावरील अडीच लाखांपर्यंतचा खर्च वजा केल्यावर तुषार यांचा निव्वळ नफा सात ते आठ लाखांवर आहे. मात्र यासाठी मार्केटिंगचीही विशेष काळजी घ्यावी लागते. शेळ्या बाजारात कधी आणाव्यात, ही वेळ फार महत्त्वाची असल्याचे ते सांगतात.
हे ही वाचा : मामाला तुरुंगात टाकल्याचा आला राग, 14 वर्षांच्या भाच्यानं घेतला खतरनाक बदला
शेळीपालनात या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात
मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो. उदाहरणार्थ, शेळ्यांच्या वेगवेगळ्या जातींसाठी स्वतंत्र कक्ष असावेत. लहान प्राण्यासाठी सरासरी 5 चौरस फूट आणि मोठ्या प्राण्यासाठी 10 चौरस फूट जागा ठेवावी लागते. त्याचप्रमाणे शेळीपालन सुरू करताना शेळ्यांच्या जातीची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. तुषार यांनी उस्मानाबादी, जमनापारी, सिरोही, सोजत, आफ्रिकन बोर आणि बारबरी या जातीच्या शेळ्यांची निवड केली आहे. तसेच शेळ्यांचे उत्तम संगोपन करण्यासाठी त्यांच्या आहार व्यवस्थापनाची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या वयोगटातील शेळ्यांना भिन्न आहार किंवा त्यांचे प्रमाण आवश्यक असल्याचे ते म्हणतात.
शेळीपालनातील यशाची गुरुकिल्ली
आहाराव्यतिरिक्त शेळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे हे या व्यवसायातील यशाचे गमक आहे. विविध आजारांमुळे जनावरांचा अकाली मृत्यू झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आजारी शेळी वेळेत ओळखून त्यावर उपचार करा. तसेच, 3-4 प्रकारचे लसीकरण तुम्हाला या त्रासापासून मोठ्या प्रमाणात वाचवू शकते. अशाप्रकारे शेळीपालन व्यवसायातून दुप्पट नफा मिळू शकतो असे तुषार यांनी सांगितले आहे.