उत्तर प्रदेश, 21 मे: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur, Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना (Shocking Incident) घडली आहे. कानपूरच्या रेल्वे बाजारात चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मामाचा बदला घेण्यासाठी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं शेजारी राहणाऱ्या 11 वर्षांच्या मुलावर सॅनिटायजर (Sanitizer) टाकून आग लावली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. तर जखमी मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बाजार येथे राहणाऱ्या फिरोजच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. फिरोजने त्याचा शेजारी फारुख याच्याविरुद्ध चोरीचा तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी फारुखला अटक करून तुरुंगात पाठवले. फारुखच्या भाच्याचे त्याच्या मामावर खूप प्रेम आहे. याच गोष्टीचा त्याला खूप राग आला, कारण मुलाच्या वडिलांनी आपल्या मामाला चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं होतं. अशा परिस्थितीत त्यानं ठरवले की, आपण आपल्या मामाचा बदला नक्कीच घेणार.
उपसभापतींना आला राग, भर वर्गात विद्यार्थ्याला लगावली कानशिलात
फिरोजची पत्नी खुशनुमानं सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी फारुखचा भाचा माझ्या 11 वर्षाच्या मुलाला खेळण्याच्या बहाण्याने मैदानात घेऊन गेला. तिथे त्याने माझ्या मुलावर सॅनिटायझर टाकून त्याला आग लावली. माझा मुलगा तिथेच तडफडत राहिला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेच्या नातेवाईकांच्या माहितीवरून पोलिसांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले. बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रमोद कुमार डीसीपी (कानपूर पूर्व) यांनी सांगितलं की, एका मुलाला सॅनिटायझरने जाळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आम्ही मुलाला रुग्णालयात दाखल केलं आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Kanpur, Uttar pradesh, Uttar pradesh news