जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Akola farming : 84 वर्षांची आजी आजही कसते शेती, तरुण पिढीलाही लाजवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील मनकर्णाबाईंची गोष्ट

Akola farming : 84 वर्षांची आजी आजही कसते शेती, तरुण पिढीलाही लाजवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील मनकर्णाबाईंची गोष्ट

Akola farming : 84 वर्षांची आजी आजही कसते शेती, तरुण पिढीलाही लाजवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील मनकर्णाबाईंची गोष्ट

चक्क 84 वर्षाच्या वयात या आजी कशी काय शेती करू शकतात? तर नेमकं या आजीच्या आयुष्यात काय घडलं

  • -MIN READ
  • Last Updated :

अकोला, 05 मे : लहान मुलांना विचारल्यावर आजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते, छान छान गोष्ट सांगणाऱ्या आजी, मायेच्या हातानं घास भरवणारी आजी, पण हेच हात 84 वर्षाच्या वयातही शेतीची (farming at old Age) कास धरतात तेव्हा काय कमाल करू शकतात याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तेही न दमता न थकता ह्या आजी शेतीत काम करतात मेहनत घेतात. तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं? चक्क 84 वर्षाच्या वयात या आजी कशी काय शेती करू शकतात? तर नेमकं या आजीच्या आयुष्यात काय घडलं त्या अजूनही शेती करतात याविषयी जाणून घेऊ या (Akola farming)

जाहिरात

अकोला जिल्हातल्या (akola) मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील 84 वर्षांच्या ‘तरुण’ आजी. या आजी अजूनही शेतात राबत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊनही गौरवलं आहे. या आजी शेतीचं संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोंचं उत्पन्न घेतात. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या त्या घरात मुला नातवंडांना घेऊन मनकर्णा आजी राहतात.

मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे 1972 ला एका आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच एकर शेती हिश्श्याला आली. मुले लहान होती, पण अशा बिकट परिस्थितीत त्यांनी लहान मुलांचा सांभाळ करत त्यांना सोबत घेऊन काबाड कष्ट करून 5 एकराची शेती त्यांनी आता 30 एकर शेती विकत घेतली. आज त्यांच्याकडे 30 एकर शेती आहे आणि या आजी स्वतः या शेतीत राबतात. त्यांनी सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिकं घेतली. (Akola farming)

जाहिरात

मात्र आता सद्यस्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला अशा पद्धतीने त्या पीक घेतात. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही अशा जमिनीत आजीने केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

हे ही वाचा :  Business Idea: काळ्या हळदीची शेती करा, किलोला 1000 रु. कमवून मालामाल व्हाल

जाहिरात

यासाठी 2002 मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आजीला नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. 84 वर्षांच्या आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणभक्ती तीक्ष्ण आहे. अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजाराने त्या ग्रस्त नाहीत.

हे ही वाचा :  ‘छोटा जहांगीर’,‘लिली’,‘फ़र्नांडीन’.. हापूस-पायरीसह हे पाहुणे मुंबईकरांच्या भेटीला

मेहनतीने कमाविले तर तरुण पिढीला लाजवेल असे काम त्या शेतात मजुरांबरोबर करतात. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही अस आजीबाई सांगतात कारण शेती असुदे अथा दुसरं कोणतही काम मेहनत घेतल्या शिवाय पर्याय नाह . मेहनतीने जर कमावलं तर त्याला डागसुद्धा लागत नाही, अशाही त्या स्वाभिमानाने सांगतात. आजींचे जीवन म्हणजे पूर्ण संघर्षमय आयुष्यात भरपूर संकटे आली मात्र आजी डगमगली नाही आणि आजीने त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर शेती करणारी आजी तरुण शेतकऱ्यांसाठी एक आदर्श बनली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात