Home /News /agriculture /

Shetkari Sanghatana : देशातील 200 शेतकरी संघटना पुन्हा एकत्र येणार, मोदी सरकारला घेरण्यासाठी असा करत आहेत प्लॅन

Shetkari Sanghatana : देशातील 200 शेतकरी संघटना पुन्हा एकत्र येणार, मोदी सरकारला घेरण्यासाठी असा करत आहेत प्लॅन

देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा (msp) कायदा होण्यासाठी 2017 पासून देशातील संघटना आंदोलन करत आहेत. (farmer msp)

  नवी दिल्ली, 31 मे : देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा (msp) कायदा होण्यासाठी २०१७ पासून देशातील संघटना आंदोलन करत आहेत. (farmer msp) केंद्र सरकारकडून देशातील 23 पिकांना हमीभाव दिला जात आहे मात्र हमीभावाचा कायदा नसल्याने 23 पिकांना हमीभाव असूनही हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून देशातील शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे.  यामुळे देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटनांच्या शेतकऱ्यांची 6 ,7 व 8 ॲाक्टोंबर रोजी दिल्ली (Delhi) येथे तीन दिवसाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) संस्थापक राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिली. 

  दिल्ली येथे अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांच्या निवासस्थानी देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. 

  हे ही वाचा : Success Story: पूर आला, कुटुंबाला कोरोना झाला तरीही खचला नाही पठठ्या; MPSC मध्ये जिद्दीनं मारली बाजी

  यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी 2017 पासून देशातील संघटना आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून देशातील 23 पिकांना हमीभाव दिला जात आहे. मात्र हमीभावाचा कायदा नसल्याने 23 पिकांना हमीभाव असूनही हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून देशातील शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. 

  हे ही वाचा : Women Farmer : नंदूरबारच्या महिलेने केली शेतीत क्रांती, कोणाचाही आधार न घेता कमवते लाखो रूपये

  यामुळे हमीभावाचा कायद्याच्या मागणीला काश्मीरपासून ते कन्याकुमारी व गुजरातपासून ते आसाम पर्यंतच्या सर्व शेतकरी संघटना एकत्रित झाल्या आहेत. केंद्र  सरकारने  हमीभाव कायद्याच्या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून  देशातील शेतकरी संघटनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

  दिल्लीच्या जंतरमंतर व सीमेवर झालेल्या आंदोलनानंतर पुन्हा देशातील शेतकरी या कायद्यासाठी आक्रमक होणार असून तीन दिवसाच्या या अधिवेशनात पुढील  देशपातळीवरील आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्याबाबत कळवळा दाखविणाऱ्या केंद्र सरकारकडे 2018 मध्ये लोकसभेत किमान हमीभावाचा कायदा सादर करण्यात आला असून केंद्र सरकार गेल्या दोन वर्षापासून या कायद्याला केराची टोपली दाखविली आहे. या बैठकीस समन्वयक व्ही. एम. सिंग, जलपुरूष राजेंद्रसिंग , छत्तीसगडचे राजाराम त्रिपाठी, काश्मिर बारामुल्लाचे मा. आमदार यावर मीर, रामपाल जाट, आदित्य चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmers protest, Raju Shetti, Raju Shetti (Politician), Swabhimani Shetkari Sanghatana

  पुढील बातम्या