मराठी बातम्या /बातम्या /Viral /चीनच्या झुरोंग रोव्हरचं मंगळावरील काम सुरू, पाठवला पृष्ठभागाचा पहिला PHOTO

चीनच्या झुरोंग रोव्हरचं मंगळावरील काम सुरू, पाठवला पृष्ठभागाचा पहिला PHOTO

मंगळावर उतरलेल्या चीनच्या (China) झुरोंग या पहिल्या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटोज पाठवले आहेत. दी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (CNSA) बुधवारी (19मे) हे फोटोज प्रसिद्ध केले आहेत.

मंगळावर उतरलेल्या चीनच्या (China) झुरोंग या पहिल्या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटोज पाठवले आहेत. दी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (CNSA) बुधवारी (19मे) हे फोटोज प्रसिद्ध केले आहेत.

मंगळावर उतरलेल्या चीनच्या (China) झुरोंग या पहिल्या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटोज पाठवले आहेत. दी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (CNSA) बुधवारी (19मे) हे फोटोज प्रसिद्ध केले आहेत.

बीजिंग 20 मे : मंगळावर उतरलेल्या चीनच्या (China) झुरोंग या पहिल्या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटोज पाठवले आहेत. दी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (CNSA) बुधवारी (19मे) हे फोटोज प्रसिद्ध केले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तसंच, 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'नेही याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

झुरोंग या रोव्हरला घेऊन चीनचं तियानवेन - वन हे यान गेल्या जुलैमध्ये चीनमधून निघालं होतं. शनिवारी (15मे) सकाळी चीनच्या यानाने मंगळाच्या (Mars) भूमीला स्पर्श करून झुरोंग (Zhurong) नावाचा रोव्हर (Rover) तिथे यशस्वीपणे उतरवला. चीनची ही पहिलीच मंगळ मोहीम असून, या पहिल्याच मोहिमेत चीनने अनेक विक्रम केले आहेत.

या रोव्हरने पाठवलेल्या एका फोटोत रोव्हरच्या समोरच्या भागातल्या मंगळाच्या पृष्ठभागाचं दृश्य दिसतं आहे. तसंच, रोव्हरच्या मागच्या बाजूचं दृश्य टिपलेल्या फोटोत झुरोंगची सोल पॅनेल्स दिसत आहेत. झुरोंगचं मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावर लँडिंग होताना तो सुरक्षितपणे उतरला असून त्याची मोडतोड झालेली नाही, याचा स्पष्ट पुरावा या फोटोजमधून मिळतो आहे, असं चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे.

लँडिंग होताना रोव्हरची मोडतोड झाली असल्यामुळे CNSA कडून कोणत्याही प्रकारचे फोटोज प्रसिद्ध करण्यात आले नसावेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्या चर्चेला यातून उत्तर देण्यात आलं आहे. चिनी पुराणकथांमधल्या अग्निदेवतेवरून झुरोंग असं नाव रोव्हरला देण्यात आलं आहे. झुरोंग या रोव्हरला सहा चाकं असून, तो सौर ऊर्जेवर चालणारा आहे. या रोव्हरचं वजन अंदाजे 240 किलोग्रॅम असून हा रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावरच्या दगडांचे नमुने गोळा करून त्यांचं विश्लेषण करणार आहे. पृष्ठभागावर उतरलेला रोव्हर तीन महिने तिथे राहणार असून तिथले फोटोग्राफ्स टिपणार आहे. तसंच तिथली भौगोलिक माहिती, नमुने गोळा करणार आहे.

सध्या 'नासा'चे क्युरिऑसिटी आणि परसिव्हरन्स हे दोन्ही रोव्हर्सही मंगळावर आहेत. 20 एप्रिल 2021 रोजी परसिव्हरन्स रोव्हरने मंगळावरच्या कार्बनडायॉक्साइडने समृद्ध असलेल्या वातावरणामधून ऑक्सिजन वेगळा करण्यात यश मिळवलं. असं यश साध्य करणारा अमेरिका हा पहिलाच देश ठरला.

अमेरिका आणि रशिया या अंतराळ क्षेत्रात मोठी कामगिरी केलेल्या देशांशी स्पर्धा करण्याच्या इराद्याने चीनही आता या क्षेत्रात नवनवी शिखरं गाठत आहे. अलीकडच्या काही वर्षांत चीनने जगातल्या पहिल्या क्वांटम सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलं. तसंच, चंद्राच्या दूरच्या बाजूवर सॉफ्ट लँडिंग यशस्वी करून रोबोटच्या सहाय्यानं तिथले नमुने गोळा करून आणले होते. चीनने आपल्या नव्या अवकाश स्थानकाचं (Space Station) पहिलं मोड्युल गेल्याच महिन्यात यशस्वीपणे लाँच केलं आहे.

First published:
top videos

    Tags: China, Mars, Photo viral