जाहिरात
मराठी बातम्या / Viral / युजवेंद्र चहलचा शर्टलेस व्हिडीओ VIRAL, 'साकी-साकी' गाण्यावर केला डान्स

युजवेंद्र चहलचा शर्टलेस व्हिडीओ VIRAL, 'साकी-साकी' गाण्यावर केला डान्स

युजवेंद्र चहलचा शर्टलेस व्हिडीओ VIRAL, 'साकी-साकी' गाण्यावर केला डान्स

युजवेंद्र चहलने पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चहलने गोव्यातील हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. त्यामुळे त्याच्या फॅन्सनी हा व्हिडीओ डॉउनलोड करून व्हायरल केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गोवा, 21 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या युजवेंद्र चहलचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच त्याने  ब्रिटिश मॉडेल आणि गायिका रमीत संधू (Rameet Sandhu) सोबत असाच एक मजेदार व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडला होता. खूप लाईक्स आणि शेअर्स या फोटोला मिळाले होते. युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) च्या डान्स मुव्ह्सचे अनेक फॅन्स आहेत. त्यामुळे त्याने पोस्ट केलेले अनेक व्हिडीओ सर्रास व्हायरल होतात. युझीने पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चहलने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. त्यामुळे त्याच्या फॅन्सनी हा व्हिडीओ डॉउनलोड करून व्हायरल केला आहे. न्यूझीलंडमध्ये 5 टी-20 आणि 3 वन-डे सीरिज खेळल्यानंतर युजवेंद्र चहल त्याच्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रांबरोबर वेळ घालवत आहे. त्यामुळे सध्या तो मित्रांसोबत गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. इथलाच एक व्हिडीओ चहलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केला होता. यामध्ये शर्टलेस दिसणारा चहल ‘साकी-साकी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

जाहिरात

कसोटी सामन्यातून चहलला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मार्च महिन्यात आयपीएलच्या हंगामात चहल खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान देखील चहलच्या मजामस्तीचे व्हिडीओ समोर आले होते. सोशल मीडिया व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) वर सुद्धा चहल वेळोवेळी आपले व्हिडिओ शेअर करत असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात