• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जुगाडाय तस्मै नम: ! बसेल धक्का, येईल हसू; पाहा Video

जुगाडाय तस्मै नम: ! बसेल धक्का, येईल हसू; पाहा Video

एखाद्या गोष्टीचं मूळ रुप बदलून किंवा एखाद्या गोष्टीला दुसरी गोष्ट जोडून त्याची उपयुक्तता किंवा सोय वाढवणं, हा प्रत्येक जुगाडामागचा उद्देश असतो. अशाच प्रकारे आपली दुचाकी चालवताना चारचाकी चालवल्याचा ‘फील’ घेण्यासाठी एका तरुणानं अनोखी शक्कल लढवली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै: आपल्याकडे सोशल मीडियाचा (Social Media) प्रभाव आणि वापर वाढत चालल्यापासून त्यावर अनेक प्रकारे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. प्रसिद्ध होण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, याचा काही भरवसा नाही. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात असे विविध प्रयोग तरुणांकडून करण्यात येतात आणि त्याला जोरदार प्रतिसादही मिळताना दिसतो.
  जुगाड आणि बरंच काही एखाद्या गोष्टीचं मूळ रुप बदलून किंवा एखाद्या गोष्टीला दुसरी गोष्ट जोडून त्याची उपयुक्तता किंवा सोय वाढवणं, हा प्रत्येक जुगाडामागचा उद्देश असतो. अशाच प्रकारे आपली दुचाकी चालवताना चारचाकी चालवल्याचा ‘फील’ घेण्यासाठी एका तरुणानं अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं आपल्या दुचाकीचं हँडल काढून त्याऐवजी एक चाक बसवलं आहे. कारच्या स्टेअरिंगसारखं हे चाक हातात पकडून हा तरूण दुचाकी चालवण्याचा आनंद घेत असल्याचं या व्हिहिओमध्ये दिसतं. हे वाचा -बापरे! इथे ब्रेडच्या पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; वजनावर घेतात नोटा रस्त्यावरून या तरुणाच्या आजूबाजूने चाललेल्या वाहनधारकांना या जुगाडू वाहनाबाबत त्याच्याशी बोलण्याचा मोह आवरत नाही. मात्र त्यांच्या प्रश्नांना त्रोटक उत्तरं देऊन हा तरुण आपल्याच धुंदीत गाडी चालवत राहतो, असं दिसतं. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची खातरजमा अजून झालेली नाही. व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या अक्षरांवरून हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असावा, असा अंदाज आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
  Published by:desk news
  First published: