• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 7 सेकंदात घातले 10 मास्क, पाहा विश्वविक्रमी VIDEO

7 सेकंदात घातले 10 मास्क, पाहा विश्वविक्रमी VIDEO

केवळ 7 सेकंदात 10 मास्क घालून (Youth make world record by wearing 10 masks in 7 seconds) एका व्यक्तीनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.

 • Share this:
  दिल्ली, 18 नोव्हेंबर: केवळ 7 सेकंदात 10 मास्क घालून (Youth make world record by wearing 10 masks in 7 seconds) एका व्यक्तीनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. जॉर्ज पिल नावाच्या व्यक्तीनं हे रेकॉर्ड केलं आहे. खरं तर मास्क हा विषय कोरोनापूर्व काळात सर्वसामान्यांशी (Mask and common man) तसा संबंधित नव्हता. प्रदूषण असलेल्या भागातील नागरिक मास्कचा वापर करत असत. त्याचप्रमाणे व्यावसायिक गरज म्हणूनदेखील अनेकजण मास्क वापरत असत. मात्र कोरोनाचं आक्रमण (Mask for everyone) झाल्यानंतर मास्क हा प्रत्येकाचा जणू परवलीचा शब्द झाला आहे.
  मास्क घालण्याचा वेळ मास्क लावण्याचा वेग किती असावा, याचा उत्तर व्यक्तीनुसार बदलत जातं. काहींना मास्क लावायला जास्त वेळ लागतो तर काहीजण पटकन मास्क चेहऱ्यावर चढवताना दिसतात. आता मास्क घराघरात रुळला असला तरी सुरुवातीच्या काळात मास्क लावणं हे देखील एक आव्हान वाटत असे. अनेकांना मास्क कानाला लावण्यासाठी वेळ लागत असे. काहीवेळा एकाच कानात मास्कचा बंद अडकणं आणि दुसरा बंद खालीच राहणं वगैरे प्रकारही अनेकांच्या बाबतीत घडतात. मात्र जॉर्ज पिल नावाच्या तरुणानं केवळ 7 सेकंदात 10 मास्क चेहऱ्यावर चढवले आणि नवा विश्वविक्रम रचला. व्हिडिओ पाहून व्हाल हैराण या व्हिडिओत जॉर्ज एकामागून एक 10 मास्क चेहऱ्यावर चढवताना दिसतो. त्याचा वेग पाहून सर्वांनाच थक्क व्हायला होतं. त्याच्या या वेगाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून त्यांच्यात इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एखादी व्यक्ती इतक्या वेगानं कसे काय चेहऱ्यावर मास्क चढवू शकते, असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडतो. हे वाचा- मुंबईत अचानक पाऊस, नागरिकांची त्रेधातिरपीट सर्वांना आहे संधी कोरोना हा आजार पुढची काही वर्ष आपल्यासोबत राहणार असल्यामुळे मास्क हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे. त्यामुळे जॉर्जपेक्षा वेगाने मास्क चेहऱ्यावर चढवण्याचा सराव करून प्रत्येकालाच हा विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध आहे.
  Published by:desk news
  First published: