मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुमच्या पाण्याच्या बाटलीपेक्षा टॉयलेट सीट जास्त स्वच्छ, तज्ज्ञांचा दावा

तुमच्या पाण्याच्या बाटलीपेक्षा टॉयलेट सीट जास्त स्वच्छ, तज्ज्ञांचा दावा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

वॉटरफिल्टरगुरु या अमेरिकन कंपनीने वॉटर ट्रीटमेंट आणि शुद्धतेवर काम करणाऱ्या अनेक गोष्टींची घरांमध्ये तुलना केली आणि अंदाजे किती बॅक्टेरिया आहेत ते सांगितले.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : कोविड काळात स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंग या सगळ्याची लोक आवर्जुन काळजी घेऊ लागले आहेत. सॅनिटायझरची बाटलीही जवळपास प्रत्येकाच्या बॅगेत नक्कीच सापडेल. याचा वापर आपण हात किंवा एखादी वस्तू साफ करण्यासाठी करतो. ही जंतूनाशक बाटली आहे, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. पण अशी एक बाटली आहे जी वायरसचं घर आहे. तुम्हाला याबद्दल माहितीय?

  ही आहे तुमच्या पाण्याची बाटली. पाण्याच्या बाटलीबाबतच्या नवीन अभ्यासात असे मानले जाते की त्यात सर्वाधिक जीवाणू असतात. हो, संशोधकांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या बाटलीत एका टॉयलेट सिटपेक्षाही जास्त जंतू असतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. चला या बद्दल सविस्तर जाणून घेऊ.

  तो मरणार हे त्याला एक दिवस आधीच ठावूक होतं? दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडला आणि...

  वॉटरफिल्टरगुरु या अमेरिकन कंपनीने वॉटर ट्रीटमेंट आणि शुद्धतेवर काम करणाऱ्या अनेक गोष्टींची घरांमध्ये तुलना केली आणि अंदाजे किती बॅक्टेरिया आहेत ते सांगितले.

  पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याची बाटली स्वच्छ दिसली तरीही तिचे प्लास्टिक निरुपद्रवी असल्याचे कंपन्यांमध्ये सांगितले जात असले तरी त्यातून पाणी पिणे सुरक्षित नसल्याचे दिसून आले.

  टॉयलेट सीटपेक्षा बाटलीच्या तोंडावर सुमारे 40 हजार पट जास्त जंतू असतात. हे प्रमाण पाळीव कुत्रे आणि मांजरींच्या पिण्याच्या भांड्यांपेक्षा 14 पट जास्त आहे. म्हणजे त्यांच्या खाण्याचे भांडे ही आपल्या बाटल्यांपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ असतात.

  अभ्यासादरम्यान, संशोधकांनी बाटलीच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी केली. त्यात बाटलीची कॅप, वरचा किंवा तोंडाचा भाग, बाटलीचा तळाचा समावेश होता. यामध्ये दोन प्रकारचे जिवाणू अधिक दिसले - बॅसिलस आणि ग्रॅम निगेटिव्ह.

  पहिल्या प्रकारामुळे पोटाचे, विशेषत: आतड्यांचे आजार होतात. दुसरा प्रकार ग्रॅम निगेटिव्ह हा अधिक धोकादायक आहे. हा असा जीवाणू आहे ज्यावर प्रतिजैविकांचाही परिणाम होत नाही. सध्या, वैद्यकीय विज्ञान प्रतिजैविक प्रतिकार हे सर्वात मोठे आव्हान मानत आहे. ही तीच स्थिती आहे, ज्यामध्ये प्रतिजैविक जीवाणूंवर कुचकामी राहतात आणि रुग्ण बरा होऊ शकत नाही.

  तज्ज्ञांना आढळून आले की, पुन्हा वापरता येण्यासारख्या बाटलीला सुरक्षित मानून आपण सतत तिला स्पर्श करून पाणी पितो, हे जीवाणूंच्या प्रजननाचे कारण बनते. त्याऐवजी, ती बाटली अधिक सुरक्षित आहे, जी वरून प्यायली जाते.

  या अभ्यासाला विरोध करत अनेक शास्त्रज्ञ असेही म्हणत आहेत की बाटलीवर कितीही बॅक्टेरिया असले तरी ते आपल्या तोंडातीलच असल्यामुळे ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकत नाहीत.

  तरुण मुलींमध्ये अकाली तारुण्य आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे प्लास्टिकच्या बाटल्या आणि भांड्यांमध्ये खाणे-पिणे हे देखील एक कारण आहे. त्याऐवजी काचेच्या आणि तांब्याच्या बाटल्या वापरण्याबद्दल तज्ज्ञ सांगतात.

  (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)

  First published:

  Tags: Drink water, Health Tips, Shocking, Water