नवी दिल्ली, 18 एप्रिल : समुद्र आणि समुद्राच्या खोलात दडलेलं जग याविषयी जाणून घेण्याची, ते पाहण्याची अनेकांना इच्छा असते. पाण्याखालील जगाविषयी अनेक अनोख्या आणि नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर येत असतात. त्यामुळे अनेकजण समुद्राच्या खोलात जाऊन हे आयुष्य एक्स्प्लोर करतात. कधी कधी समुद्राखालील प्राण्यांना सामोरं जाणं धोकादायही ठरतं. याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शार्कने महिलेवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
तरुणी समुद्रात पोहत असताना तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये शार्कने तरुणीवर केलेला हल्ला कैद झालाय. हेही वाचा - शास्त्रज्ञांनी डॉल्फिनवर लावला कॅमेरा, समुद्रातील आश्चर्यकारक दृश्य झालं कैद, पाहा Video व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी समुद्राच्या पाण्यात मस्त पोहत आहे. तेवढ्यात एक शार्क येते आणि तिच्यावर हल्ला करते. या हल्ल्यात तरुणीच्या पाठीवर ओरखडेही पहायला मिळत आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. @TachiraNoticias नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
¡DE TERROR!🚨🦈Carmen Canovas Cervello, de 30 años, sufrió un momento de terror cuando nadaba con tiburones nodriza en un playa de las Maldivas.
— Táchira Noticias (@TachiraNoticias) April 14, 2023
De manera repentina, un ejemplar volteó y mordió un área de 15cm entre su espalda y su hombro izquierdo. Un amigo grabó todo. pic.twitter.com/V5T0Al2TGT
ही घटना 30 वर्षीय कारमेन कॅनव्हास सेर्व्हेलो तिचा मित्र आणि फोटोग्राफर इब्राहिम शफीगसोबत मालदीवच्या समुद्रात स्नॉर्कलिंगचा आनंद घेत असताना घडली. यादरम्यान, सेर्व्हेलो समुद्राच्या त्या भागात गेला होता, जिथे शार्कचा मोठा कळप आहे. सुरुवातीला काही काळ सर्व काही ठीक होते. स्नॉर्कलिंगचा आनंद लुटणाऱ्या स्वीमरच्या आजूबाजूला अनेक शार्क येत होते. पण थोड्याच वेळात सेर्व्हेलोच्या जवळ शार्क आले आणि तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे तिच्या पाठीवर सुमारे 6 इंच लांब जखम झाली.