Home /News /viral /

डिप्रेशनमुळे बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव; घटना CCTV मध्ये कैद; पाहा VIDEO

डिप्रेशनमुळे बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव; घटना CCTV मध्ये कैद; पाहा VIDEO

ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ बघून सारेच हादरले आहेत.

    ग्वालियर, 22 जून : आजकालच्या काळात तरुणाईमध्ये डिप्रेशनचं (Depression in Youth) प्रमाण वाढू लागलं आहे. जॉबचं टेन्शन असो, घरचे काही प्रॉब्लेम्स किंवा प्रेमभंग आजकाल कोणालाही डिप्रेशनमध्ये जाण्यास वेळ लागत नाही. यामुळे अनेक लोकं आत्महत्येचं पाऊलही उचलतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील (MP) ग्वालियरमध्ये (Gwalior) घडली आहे. एका तरुणीनं डिप्रेशनमध्ये एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ बघून सारेच हादरले आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अचानक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याच्या छताच्या रेलिंगवर एक तरुण स्त्री उभी असल्याचं नागरिकांना दिसलं. लोकांनी तिला बोलावलं पण त्याआधीच मुलीनं उडी मारली. खाली असलेल्या रस्त्यावर ती डोक्यावर पडली आणि तिथे तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोला मंदिर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हे वाचा - अमेरिकेच्या उद्योगाने समुद्रात भूकंप! 18000 किलोचा बाँब फोडला; पाहा VIDEO पोलिसांनी तपास केला असता मृतक मुलीची ओळख शहरातील वायू नगर येथील रहिवासी 32 वर्षीय ज्योती चांदोलिया अशी आहे. पोलिसांनी तातडीने मुलीच्या कुटूंबाला माहिती दिली. माहिती मिळताच मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. ती तणावात होती आणि तिच्यावर उपचार चालू होते असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दुपारी ती मित्राला भेटायला जात आहे असं सांगून घराबाहेर पडली होती. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी जवळपासच्या सर्व CCTV कॅमेराचे फुटेज तपासले. यात ती पायी आली आणि कोणाशीही न बोलता अपार्टमेंटमध्ये गेली. यानंतर ती सीसीटीव्हीमध्ये खाली पडताना दिसत आहे. त्यामुळे ही आत्महत्याच आहे असा अंदाज पोलिसांचा आहे. या अपार्टमेंटमध्ये त्यांचे कोणतेही नातेवाईक किंवा मित्र राहत नसल्याचं ज्योतीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. मुलगी ज्योती कधीच इथे आली नव्हती. तिनं इथे येऊन आत्महत्या का केली हे कळत नाही आहे असं ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं. त्यामुळे आता तिनं आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Depression, Gwalior, Shocking viral video

    पुढील बातम्या