वॉशिंग्टन डीसी, 22 जून: अमेरिकेनं (USA shock testing bomb blast under sea) पुन्हा एकदा आपली शस्त्रसज्जता वाढवायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था गडगडली आहे. त्यात चीन (China), रशिया (Russia) आणि इराणबरोबर (Iran) अमेरिकेचे संबंध गेल्या काही महिन्यांत कमालीचे ताणले जात असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं नेव्हीतील (US Nevi) शस्त्रसज्जतेवर लक्ष केंद्रीत केलंय. नुकतीच एका विमाननाहू युद्धनौकेच्या (Aircraft Carrier) चाचणी घेण्यासाठी अमेरिकेनं समुद्रात मोठा स्फोट घडवला. समुद्रातील विमानवाहू तळांची क्षमता तपासण्यासाठी अमेरिकेनं त्यावर स्फोटकांचा मारा करून चाचणी केली. ज्या जहाजावरून लढाऊ विमाने (Fighter Planes) उड्डाणं करतात, त्या जहाजाची क्षमता तपासण्यासाठी त्यावर तब्बल 18 हजार 144 किलोची स्फोटकं टाकण्यात आली. या जहाजांवर प्रत्यक्ष झाला तर काय होईल, याची चाचणी करण्यासाठी (Shock Test) केलेल्या या स्फोटांमुळे प्रचंड आवाज तर झालाच, शिवाय समुद्रही खवळला. स्फोटामुळे पाणी उंचवर उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.
Ever wonder what a 40,000 pound explosive looks like from the bridge wing of a @USNavy aircraft carrier?
— USS Gerald R. Ford (CVN 78) (@Warship_78) June 20, 2021
Watch footage from #USSGeraldRFord's first explosive event of Full Ship Shock Trials and find out! 🤯#ThisIsFordClass #WeAreNavalAviation #Warship78 pic.twitter.com/2kbeEkF0g1
या स्फोटामुळे जाणवलेल्या हादऱ्याची तीव्रता इतकी होती की या परिसरातील भूकंपमापक यंत्रावर 3.9 रिश्टर क्षमतेच्या हादऱ्यांची नोंद झाली. अमेरिकेच्या नेव्हीकडून याबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनात या घटनेला ‘Shock Testing’ असं म्हणण्यात आलंय. या स्फोटाचा उद्देश काय? देशाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा सक्षम आहे की नाही, हे दर काही वर्षांनी तपासून पाहिलं जातं. त्यासाठी प्रत्यक्ष युद्धासारखी परिस्थिती तयार करून आणि तितक्याच तीव्रतेच हल्ले करून संरक्षण यंत्रणेचं परीक्षण करण्यात येतं. या परिक्षणात यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या, तर त्या ओळखून तातडीनं दुरुस्त करण्यासाठी या परिक्षणाचा उपयोग होतो. हे वाचा - अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू विस्फोट नेमका कुठे केला? ज्या जहाजावर स्फोटकं डागण्यात आली, त्याचं नाव आहे युएस जेराल्ड आर फोर्ड. अटलांटिक महासागरात फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून साधारण १०० मैलांवर हा स्फोट घडवण्यात आला. हे जहाज पाण्यावर तरंगत असताना त्याच परिसरात पाण्याच्या खाली हा शक्तीशाली स्फोट करण्यात आला. पर्यावरणवाद्यांचा आक्षेप अशा प्रकारच्या शक्तीशाली स्फोटामुळे समुद्रातील अनेक प्रजातींच्या अस्तित्वावर घाला घातला जात असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केलाय. वेगवेगळ्या जातीच्या माशांसह अनेक छोटेमोठे जीवजंतू या स्फोटात मारले गेल्याची भीती व्यक्त कऱण्यात येतेय. तर समुद्रातील प्रजातींना कुठलाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेतच हा स्फोट घडवल्याचं अमेरिकन नेव्हीनं म्हटलंय.