मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणाने पोटाचा केला गल्ला; ऑपरेशन करुन 63 नाणी काढली बाहेर, डॉक्टर हैराण!

तरुणाने पोटाचा केला गल्ला; ऑपरेशन करुन 63 नाणी काढली बाहेर, डॉक्टर हैराण!

शस्त्रक्रिया करीत असताना तरुणाच्या पोटातून तब्बल 63 नाणी बाहेर काढण्यात आली. जे पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले.

    जयपूर, 31 जुलै : राजस्थानमधील जोधपुरच्या मथुरादास माथुर रुग्णालयात शुक्रवारी एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एक तरुण पोटात दुखत असल्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात घेऊन आला होता. डॉक्टरांनी एक्स-रे केलं तर तरुणाच्या पोटात मेटल दिसून आलं. ज्यानंतर डॉक्टरांनी तरुणावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करीत असताना तरुणाच्या पोटातून तब्बल 63 नाणी बाहेर काढण्यात आली. जे पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले. तब्बल दीड तास या तरुणीवर शस्त्रक्रिया सुरू होती आणि यावेळी 63 नाणी त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. तरुणाचं वय 36 वर्षे... जोधपूर शहरातील चौपासनी हाऊसिंह बोर्डचे निवासी 36 वर्षीय तरुणाच्या पोटात गुरुवारी अचानक वेदना सुरू झाल्या. ज्यानंतर कुटुंबीयांनी त्याला गुरुवारी सायंकाळी साधारण 4 वाजता मथुरादास माथूर रुग्णालयात नेलं. येथे तरुणाला अॅडमिट करून घेण्यात आलं. शुक्रवारी डॉक्टरांची एक्स-रे केले तेव्हा पोटात काहीतरी मेलटसारखं असल्याचं दिसलं. याबाबत तरुणाला विचारलं तर त्याने आपण नाणी गिळल्याचं  कबुल केलं. यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेची तयारी केली. दीड तास सुरू असलेल्या या शस्त्रक्रियेत त्याच्या पोटातून तब्बल 63 नाणी बाहेर काढण्यात आली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Private hospitals, Rajasthan

    पुढील बातम्या