नवी दिल्ली, 20 जानेवारी : सेलिब्रिटी कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आपणही त्यांच्यासारखं व्हायरल व्हावं किंवा चर्चेत यावं यासाठी अनेजकजण त्यांची नक्कल किंवा त्यांच्यासारखे व्हिडीओ बनवतात. सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे हुबेहुब दिसणारे लोक आढळतात. त्यांचे फोटो व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. अशातच आणख्या एका सेलिब्रिटीची डुब्लीकेट पहायला मिळाली. तिचा व्हिडीओ सध्या इंटरनेवर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर ज्या सेलिब्रिटीच्या डुब्लीकेटची चर्चा रंगली आहे ती सेलिब्रिटी दुसरी तिसरी कोणी नसून धकधक गर्ल माधुरी दीक्षित आहे. माधुरीच्या डुब्लीकेटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. माधुरीची कार्बन कॉपी असलेल्या या महिलेचं नाव मधू शर्मा आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून माधुरीच्या गाण्यांवर व्हिडीओ बनवते. फक्त व्हिडीओ बनवत नाही तर ती माधुरीचे गाणे घेऊन हुबेहुब तिच्यासारखा लुक करुन व्हिडीओ बनवते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करते.
मधूने माधुरीच्या गाण्यावर बनवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिचा व्हिडीओ पाहून अनेकांना माधुरी दिक्षितचीच आठवण झाली. तिच्या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत असलेले पहायला मिळत आहे. काहींनी तिला माधुरीसारखी दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिला अजिबात तिच्यासारखी दिसत नाही, असं म्हटलं आहे. यावरुन तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यामुळे मधूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, बी-टाऊनची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज माधुरी लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. आपल्या अभिनयाच्या, सुंदरतेच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. माधुरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.