जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मांजरींना मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून द्यायचा त्रास, तरुणाचा धक्कादायक छंद; सत्य आलं समोर

मांजरींना मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून द्यायचा त्रास, तरुणाचा धक्कादायक छंद; सत्य आलं समोर

मांजरींना मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून द्यायचा त्रास

मांजरींना मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवून द्यायचा त्रास

जगभरात लोकांना वेगवेगळा छंद असतो. आपली आवड आपला छंद पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही लोकांचा विचित्र छंदही असतो जो तुम्ही क्वचितच ऐकला असेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै: जगभरात लोकांना वेगवेगळा छंद असतो. आपली आवड आपला छंद पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही लोकांचा विचित्र छंदही असतो जो तुम्ही क्वचितच ऐकला असेल. काही जणांचा भीतीदायक, भयानक छंदही समोर येतात. नुकतीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाला खूप विचित्र छंद होता. तो मांजरींना मारायला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. 22 वर्षीय तरुण थॉमस मार्टेलवरवर 6 मांजर मारल्याचा आरोप असून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली. थॉमसच्या मैत्रिणीनं यांसंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यावर हा प्रकरा उघडकीस आला.

News18लोकमत
News18लोकमत

थॉमस मार्टेलवरच्या मैत्रिणीनं शिकागो पोलिसांकडे मार्टेलवरची तक्रार दाखल केली. तिनं पोलिसांना सांगितलं की, थॉमस मांजरींना मायक्रोव्हेवमध्ये ठेवायचा मग प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरायचा. तिला हे कळलं तेव्हा कोणीतरी तिला व्हिडीओ पाठवला होता ज्यामध्ये थॉमस मांजरीला उशीच्या कव्हरमध्ये चाकून तलावात सोडत होता. थॉमसनने मैत्रिणीला सांगितलं होतं की, त्याला मांजरी मारण्याचा छंद आहे आणि तो 8 वर्षाच्या असल्यापासून हे करतो. व्यक्ती गाढवासोबत काढत होता Video, तेवढयात खोडकर प्राण्याने केलं असं काही… शिकागो पोलिसांनी सांगितलं की, थॉमस मार्टेलवर प्राण्यांवरील क्रुरतेचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. मार्टेलने मारलेल्या सर्व मांजरींचं नाव शेली होतं. त्याने विकत घेतलेल्या सर्व मांजरींचं नाव तो शेली ठेवायचा. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर थॉमसनच्या वकिलांनी सांगितलं की, त्याच्यावर मानसिक उपचार सुरु असून त्याची मानसिक स्थिती ठिक नाहीय. दरम्यान, हे धक्कादायक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. असे विचित्र, भयानक प्रकरणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात