नवी दिल्ली, 16 जुलै : प्राणी खूप निष्ठावाण असल्याचं म्हटलं जातं. त्यांना जेवढा जीव लावू तेवढाच ते आपल्यालाही लावतात. त्यामुळे नेहमीच असं म्हटलं जातं की, माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त जीव लावावा. माणूस आणि प्राण्यांमधील प्रेम दाखवणारे अनेक फोटो व्हिडीओ समोर आले आहेत. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये गाढव आपल्या मालकासमोर लाड घालताना दिसत आहे. माणूस गाढवासोबत व्हिडीओ काढतानाचं दृश्य समोर आलं आहे. ज्यामध्ये गाढव माणसासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाावर जोरदार व्हायरल होतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपल्या पाळीव गाढवासोबत मोबाईलसमोर आहे. तो तिच्यासोबत व्हिडीओ काढत आहे. गाढवाने मालकाच्या गळ्यात डोकं ठेवलं आहे. मग त्याचा मालक त्याला म्हणतो स्टीव्ह, कानात फुंकलेलं आवडत नाही. गाढव नंतर आपलं तोंड त्याच्या डोक्याच्या दुसऱ्या बाजूला हलवते आणि त्याच्या कान चाटू लागते. कान चावू नकोस, म्हणत मालक त्याला हे करण्यापासून थांबवतो. मग स्टीव्ह अचानक थांबतो आणि कॅमेराकडे पाहू लागतो.
“Steve, not the ears” 😂
— Buitengebieden (@buitengebieden) July 14, 2023
🎥 @gojacobsridge pic.twitter.com/s7UUXXRy8T
हा व्हिडीओ @buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक अनेक मजेशीर कमेंट या व्हिडीओवर करताना दिसत आहे. दरम्यान, असे पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. कुत्रा, मांजर असे वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची जास्त पसंती मिळत असते.