मराठी बातम्या /बातम्या /Viral /चीनमध्ये रंगतंय Wrist Challenge, लागलीय बारीक असण्याची स्पर्धा

चीनमध्ये रंगतंय Wrist Challenge, लागलीय बारीक असण्याची स्पर्धा

चीनमध्ये सध्या अनोखं रिस्ट (Wrist challenge goes viral in China promoting skinny people) चॅलेंज सोशल मीडियात ट्रेंडिंग असून कोण किती बारीक आहे, याचीच स्पर्धा लागली आहे.

चीनमध्ये सध्या अनोखं रिस्ट (Wrist challenge goes viral in China promoting skinny people) चॅलेंज सोशल मीडियात ट्रेंडिंग असून कोण किती बारीक आहे, याचीच स्पर्धा लागली आहे.

चीनमध्ये सध्या अनोखं रिस्ट (Wrist challenge goes viral in China promoting skinny people) चॅलेंज सोशल मीडियात ट्रेंडिंग असून कोण किती बारीक आहे, याचीच स्पर्धा लागली आहे.

बिजिंग, 22 नोव्हेंबर: चीनमध्ये सध्या अनोखं रिस्ट (Wrist challenge goes viral in China promoting skinny people) चॅलेंज सोशल मीडियात ट्रेंडिंग असून कोण किती बारीक आहे, याचीच स्पर्धा लागली आहे. सोशल मीडियावर अधूनमधून काही चॅलेंजेस हे (Trending challenges) ट्रेंडिंग होत असतात. साडी चॅलेंजपासून ते जुन्या काळातील फोटो टाकण्यापर्यंत अनेक चॅलेंजेस हे त्या त्या काळात ट्रेंडिंग असतात. चीनमध्येही असंच एक चॅलेंज (Competition to show skinniness) सध्या गाजत असून त्यातून कोण किती बारीक आहे, हे दाखवण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.

काय आहे चॅलेंज?

जी व्यक्ती अतिशय बारीक आणि हाडकुळी असते, तिच्या तळहात आणि मनगट यांच्या मध्ये एक खड्डा पडतो. या खड्ड्यात कोण किती पाणी साठवू शकतं, याची ही स्पर्धा आहे. तुम्ही बारीक आहात की नाही, याचा पुरावाच हातावरचा हा खड्डा देत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक महिला आपल्या बारीकपणाचा पुरावा देण्यासाठी आपल्या मनगटाजवळील खड्ड्यात पाणी भरून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याचं चित्र आहे.

बारीकपणा आणि सौंदर्य

आशिया खंडात अनेक ठिकाणी बारीक असणं आणि सौंदर्य यांचा जवळचा संबंध असलेला दिसतो. ज्या व्यक्ती बारीक आहेत, त्या लठ्ठ व्यक्तींच्या तुलनेत सुंदर समजल्या जातात. अनेकजण बारीक होण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन आणि व्यायामाचे प्लॅनही करताना दिसतात. तर अशा बारीक असणं आवडणाऱ्या नागरिकांना त्यांचा बारीकपणा दाखवून देण्याची संधी या चॅलेंजमधून मिळत आहे. त्यानुसार आपणच कसे बारीक आहोत आणि आपल्या मनगटाजवळच्या खड्ड्यात कसं सर्वाधिक पाणी मावतं, हे दाखवण्याची अनोखी स्पर्धाच युजर्समध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा- ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’

लाखो जणांचा प्रतिसाद

टिकटॉकवर या चॅलेंजचा जोरदार प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे चॅलेंज 3 कोटी लोकांनी पाहिलं आहे. टिकटॉकप्रमाणेच Douyin या ऍपवरदेखील हे चॅलेंज ट्रेंडिंग आहे. बारीकपणाला प्रमोट करण्याचं काम यातून केलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: China, Social media, Tik tok