मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वाह रे पठ्ठ्यांनो..! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची जबरदस्त कुस्ती; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच

वाह रे पठ्ठ्यांनो..! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची जबरदस्त कुस्ती; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन अतिशय लहान मुलं मातीमध्ये बसलेली आहेत. हे दोघंही केवळ शांत बसलेले नाहीत तर ते कुस्ती खेळताना दिसत आहेत (Wrestling Video of Babies).

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असाल तर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहात असाल. मात्र, यातील काही व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचं मन जिंकतात आणि चांगलेच चर्चेत येतात. लहान मुलांच्या व्हिडिओलाही (Videos of Babies) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांची पसंती मिळते. कधीकधी हे व्हिडिओ खळखळून हसवणारे तर कधी हैराण करणारे असतात. सध्या अशाच दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या हे दोघंही चक्क खुल्या मैदानात कुस्ती खेळताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन अतिशय लहान मुलं मातीमध्ये बसलेली आहेत. हे दोघंही केवळ शांत बसलेले नाहीत तर ते कुस्ती खेळताना दिसत आहेत (Wrestling Video of Babies). एकमेकांना खाली पाडण्यात दोघंही मग्न आहेत.

या चिमुकल्यांकडे कुस्ती खेळण्यासाठी मैदान नसलं तरीही रस्त्यावरच ती या कुस्तीची मजा घेत आहेत. एकमेकांना खाली पाडण्यासाठी या चिमुकल्यांमध्ये चढाओढ लागली आहे. हा मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे समोर आलेलं नाही.

व्हिडिओमध्ये दिसतं, की सुरुवातीपासूनच या दोन्ही चिमुकल्यांमध्ये एकमेकांना खाली पाडण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. मात्र, समोरचा आपला हाताबाहेर असल्याचं दिसताच त्यातील एक लहान मुलगा तिथून पळ काढू लागतो. मात्र, दुसरा जिद्दी चिमुकला त्याच्या मागे पळून त्याला पुन्हा जमिनीवर पाडतो. दोघांचा हा खेळ अतिशय मजेशीर आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे तसंच यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन रिट्विटही केला आहे.

First published:

Tags: Funny video, Small baby, Wrestler