नवी दिल्ली, 6 मार्च : आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक निरनिराळे मार्ग वापरताना दिसतात. डाएट, जीम, योगा, असे वेगवेगळ्या गोष्टी करत करत लोक आपलं वजन कमी करतात. लोक बाहेरचं फास्ट फूड खाणं देखील कमी करतात. मात्र एका व्यक्तीने चक्क मॅकडोनाल्डचे बर्गर आणि फ्राईज खाऊन वजन कमी केले. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, माजी कुस्तीपटू केविन मॅगिनिसने आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत फक्त आणि फक्त मॅकडोनाल्डच्या जेवणाचा समावेश केला आहे. त्याने वजन कमी करण्याच्या या मंत्राला “फ्रेंच फ्राईज टू फिट गाईज” असे नाव दिले. टेनेसीच्या नॅशविल येथे राहणाऱ्या केविनने 108 किलो वजन कमी केल्यामुळे लोक सर्वात जास्त थक्क झाले आहेत. हेही वाचा - मोटरसायकल आहे की सुपरकार? गाडीला पाहून लोक झाले कन्फ्युज 56 वर्षीय केविन मॅगिनिसने एका टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले की, 21 फेब्रुवारी रोजी त्याने ठरवले होते की त्याला त्याचे वजन कमी करायचे आहे, जे 108 किलोपर्यंत पोहोचले आहे. यासाठी त्यानी पुढचे 100 दिवस मॅकडोनाल्डमध्ये बनवलेल्या वस्तूच खाण्याचा निर्णय घेतला. केविनच्या मते, अन्नाच्या गुणवत्तेपेक्षा अन्नाचे प्रमाण अधिक महत्त्वाचे असते. कुस्तीपटू केविन आणि लष्करी पुरुषाने वजन कमी करण्यासाठी कॅलरीज कमी केल्या.
केविनने मॅकमफिन्स आणि हॅश ब्राउन्ससोबत आपला प्रवास सुरू केला पण हळूहळू तो बर्गर आणि फ्राईजकडे वळला. त्यानं सर्व काही खाल्ले नाही, परंतु फक्त अर्धे अन्न खाल्ले. तो सोड्याऐवजी पाणी प्यायचा. त्याच्या आहाराच्या 10 व्या दिवसापर्यंत त्याने आपले वजन सुमारे 6 किलोने कमी केले होते. त्यामुळे त्याला माहित होते की त्याच्या या आहार योजनेमुळे वजन कमी होऊ शकते. 100 दिवसांत केविनने आपलं वजन कमी केलं.

)







