नवी दिल्ली, 29 जून : बऱ्याच सेलिब्रिटी त्यांच्या विचित्र हँडबॅगमुळे चर्चेत येतात. त्यांच्या हँडबॅगचा आकार इतका लहान असतो की त्यात काय राहत असेल असा प्रश्न पडतो. पण आता सेलिब्रिटींच्या हातातील बॅगपेक्षाही छोटी बॅग तयार झाली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल ही बॅग इतकी लहान आहे की ती तुमच्या एका बोटावर राहिल. मिठाच्या एका कणापेक्षाही लहान या बॅगचा आकार आहे. पण याची किंमत 51 लाख रुपये आहे, त्यामुळे याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात छोट्या बॅगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही बॅग डोळ्यांनी पटकन दिसणंही मुश्किल आहे. हातावर मिठाचा एक कण घ्यावा तितकीच ही बॅग आहे. ती इतकी छोटी आहे की सुईच्या छेदातूनही बाहेर पडेल. या बॅगेचा आकार 657x222x700 मायक्रोमीटर इतका आहे. बॅगेचा रंग हिरवा-पिवळा आहे.
ही स्पष्टपणे पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज पडते. अशी बॅग तब्बल 51 लाख रुपयांना विकली गेली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. प्लेनचं असं तिकीट, एकदा खरेदी केल्यावर लाइफटाइम जगभर विमान प्रवास FREE लुई वुईटनची ही बॅग. बॅगेवर याचा लोगोही आहे. हे एक इंटरनॅशनल लक्झरी ब्रँड आहे. ज्यांच्या एका एका बॅगची किंमत लाखोंमध्ये असते. कित्येक सेलिब्रिटीही या ब्रँडची बॅग वापरतात. न्यूयॉर्कमधील MSCHF या कला समूहाने या बॅगेचा लिलाव केला. हा ग्रुप आपल्या विचित्र लिलावासाठी प्रसिद्ध आहे. या बॅगेचा लिलाव ऑनलाईन करण्यात आला आहे. डिजिटल डिस्प्ले असलेल्या मायक्रोस्कोपसह ही बॅग विकण्यात आली. जेणेकरून ग्राहकाला ती पाहता येईल. लिलावात ती 63 हजार डॉलर्स म्हणजे जब्बल 51.6 लाख रुपयांना विकली गेली. इतकी छोटी बॅग पाहिल्यावर साहजिकच चर्चा होणार. या बॅगेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी याला मुंगीपेक्षाही छोटी बॅग असल्याचं म्हटलं आहे. कुणी ही बॅग बनवताना किती काळजी घ्यावी लागली असेल असं म्हटलं. एका युझरने या बॅगेचा उपयोग काय, असा सवाल केला आहे. काय म्हणावं आता! घरात राहिल्या मुंग्या; घरमालकाने त्यांचंही ‘भाडं’ वसूल केलं बॅगेच्या वापराबाबत काही माहिती नाही. पण तिचा आकारच तिला सर्वांपेक्षा वेगळं बनवतो. तुम्ही अशी बॅग घेणार का? आणि घेतली तर त्याचं काय कराल? या बॅगेचा काय उपयोग होऊ शकतो, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.