सिडनी, 28 जून : कितीही स्वच्छता ठेवली, किती साफसफाई केली तरी घरात मुंग्या कधी ना कधी येतात. त्या कुठून येतात हा प्रश्न आपल्यालाही पडतो. पण तरी कधी आपल्या घरात मुंग्या आल्या म्हणून तुम्ही त्यांचं घरभाडं वसूल केलं आहे का? पण एका व्यक्तीने ते केलं. त्याच्या घरात मुंग्या दिसल्या म्हणून त्यांचंही भाडं वसूल केलं आहे. ऑस्ट्रेलियातील हे विचित्र प्रकरण आहे. जे
व्हायरल
होतं आहे. एका कॉमेडियनसोबत घडलेला हा प्रकार. सिडनीतील कॉमेडिनय टॉम कॅशमॅन आणि त्याच्या दोन रूममेट्स या घरात राहत होते. ते तिघंही घराबाहेर आले होते. कॅशमॅन तेव्हा सिडनी कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होता. तेव्हा रिअल इस्टेट एंजटचा त्यांना ई-मेल आला. त्यात जे काही लिहिलं होतं, ते वाचून ते लोक चक्रावून गेले. कॅशमॅन ज्या घरात राहत होत्या त्या घराच्य मालकाला घरात मुंग्या दिसल्या. फक्त चार मुंग्या होत्या पण त्याने यांचं भाडं मागितलं. आता भांडं मागितलं म्हणजे नेमका काय प्रकार पाहुयात.
संतापजनक VIDEO! बाळाला उकळत्या दुधाची अंघोळ; तडफडत होता चिमुकला, सर्व पाहत राहिले तमाशा
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार कॉमेडियनच्या म्हणण्यानुसार, एजंटने ई-मेलमध्ये लिहिलं की, घरमालकाला त्याच्या स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये मुंग्या आढळल्या. ज्यांना दूर करण्यासाठीपेस्ट कंट्रोल केलं. याचा एकूण खर्च 99 डॉलर म्हणजे जवळपास 8 हजार रुपये झाला. ही जबाबदारी भाडेकरूची असल्याने त्याला पैसे द्यावे लागतील. कॅशमॅनचा दावा आहे की त्याने आपल्या घरात कधीही मुंग्या पाहिल्या नाहीत. एजंटला याचा पुरावा मागितला असता त्याने चार मुंग्यांचे फोटो पाठवले. एका मुंगीसाठी त्याने 25 डॉलर्स मागितले, याचा विचार करून कॉमेडियन थक्क झाला.
YOGA बाबत डॉक्टरांनी असं काही सांगितलं की, पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
प्रकरण इतकं वाढलं की ऑस्ट्रेलिया फेअर ट्रेडिंगमध्ये पोहोचले, जिथे कॅशमन आणि त्याच्या रूममेट्सच्या बाजूने निर्णय देण्यात आला.
फोटो सौजन्य - Youtube/@TomCashman
एजंटला ‘मुंगीचा प्रादुर्भाव’ शुल्क काढून टाकण्यास भाग पाडलं. मात्र, आता रिअल इस्टेट एजन्सीने या प्रकरणाला न्यायाधिकरणात आव्हान दिलं आहे. पण कॅशमॅनला आशा आहे की 4 मुंग्या त्याचं नुकसान करू शकणार नाहीत.