जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात 'झपाटलेलं' बेट! जिथे लाखो लोकांना जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा इतिहास

जगातील सर्वात 'झपाटलेलं' बेट! जिथे लाखो लोकांना जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा इतिहास

पोवेग्लिया आयलंड नावाचं बेट

पोवेग्लिया आयलंड नावाचं बेट

बेटावरील कोणत्याही लोकांमध्ये प्लेगची लक्षणे दिसली की त्याला जिवे मारण्यात आले! ब्लॅक डेथ (प्लेग) टाळण्यासाठी इथल्या बर्‍याच लोकांना जिवंत जाळण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 जून : भूत-प्रेत यावर विश्वास ठेवावा की नाही हे लोकांच्या स्वतःच्या विश्वासावर अवलंबून आहे, परंतु जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी झपाटलेली असल्याचं मानलं जातं. लोकांचा दावा आहे, की तिथे भुतं राहतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात झपाटलेल्या बेटाबद्दल सांगणार आहोत. हे सध्या इटलीमध्ये आहे आणि इथं भुतं आहेत किंवा नाहीत, याबद्दलचा दावा आम्ही करत नाही. पण इथला इतिहास अतिशय विचित्र आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुमच्या अंगावरही काटा येईल. एस्केप वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, उत्तर इटलीमध्ये व्हेनिस आणि लिडो यांच्यामध्ये पोवेग्लिया आयलंड नावाचं एक बेट आहे. हे जगातील सर्वात भयानक बेट मानलं जातं. त्याला भूताचं बेट असंही म्हणतात. त्याचा इतिहास खूप जुना आहे. इ.स. 421 मध्ये जेव्हा आक्रमकांनी इटलीवर हल्ला केला तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी इकडे धावत असत. त्या काळात येथे शेकडो लोकांचा बळी गेला. त्यामुळे इथून हळूहळू लोकसंख्या नाहीशी झाली आणि एकवेळ अशी आली की इथे कोणीही उरलं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

1300 मध्ये जेव्हा युरोपमध्ये प्लेगची महामारी पसरली तेव्हा हे ठिकाण डंपिंग बेट बनले होते. प्लेगची लागण झालेल्या किंवा प्लेगमुळे मृत्यू झालेल्या लोकांना येथे आणून टाकले जात असे. प्लेग टाळण्यासाठी आणि सेल्फ आयसोलेशनसाठी अनेक लोक येथे येत असत. कोरोना महामारीच्या काळातही सेल्फ-आयसोलेशनचा फायदा तुम्ही पाहिला असेल, ज्यामुळे महामारी कमी होण्यास मदत झाली. पण बेटावरील कोणत्याही लोकांमध्ये प्लेगची लक्षणे दिसली की त्याला जिवे मारण्यात आले! ब्लॅक डेथ (प्लेग) टाळण्यासाठी इथल्या बर्‍याच लोकांना जिवंत जाळण्यात आले. आता हे बेट पर्यटक किंवा स्थानिक लोकांसाठी पूर्णपणे बंद आहे. अहवालानुसार, प्लेगच्या वेळी सुमारे 1.6 लाख लोक येथे दफन करण्यात आले होते. असं मानलं जातं की आजही या बेटाच्या मातीत 50 टक्के मानवी अवयव आढळतात. पण बेटाची गोष्ट इथेच संपत नाही. 1800 आणि 1900 च्या काळात या बेटावर वेड्यांसाठी एक मेन्टल हॉस्पिटल बांधले गेले. The Poveglia Asylum मधील डॉक्टर इतके भयानक होते की ते लोकांवर खूप धोकादायक आणि विचित्र प्रयोग करायचे. त्यांच्या मृत्यूनंतरही ते त्यांना इथेच दफन करायचे. गेल्या काही वर्षांत सरकारने या बेटाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथे अशा काही घटना घडतात की, कोणीही येथे फार काळ राहू शकत नाही. येथे पोहोचल्यानंतर लोकांनी नकारात्मक ऊर्जा जाणवल्याचा दावा केला आहे. याशिवाय बेटाच्या जवळ शिकार करणाऱ्या मच्छीमारांनीही रात्रीच्या वेळी बेटावर गूढ गोष्टी पाहिल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात