Home /News /viral /

फिल्मी नाही रिअल! बदला घेण्यासाठी पत्नीनं केलं पतीच्या मारेकऱ्याशी लग्न, आणि....

फिल्मी नाही रिअल! बदला घेण्यासाठी पत्नीनं केलं पतीच्या मारेकऱ्याशी लग्न, आणि....

पत्नीनं पतीच्या हत्येचा बदला (women revenge) घेण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याशी लग्न केले आणि नंतर त्याची हत्या (women married husband killer and killed him) केल्याची एक घटना उघड झाली आहे.

    मुंबई, 17 जुलै : आई-वडिल किंवा घरातील अन्य कोणत्या व्यक्तीवर व्हिलन अन्याय करतो. अनेकदा त्यामध्ये त्यांची हत्या करतो. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हिरो आधी त्या व्हिलनचा विश्वास संपादन करतो. एकदा व्हिलनचा विश्वास संपादन केला की नंतर त्याच्या टोळीसह खात्मा करतो. या प्रकारची गोष्ट आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिली आहे. पण काही वेळा सिनेमातील स्टोरी देखील प्रत्यक्षात घडताना दिसतात.  तसाच एक प्रकार उघड झाला आहे.  पत्नीनं पतीच्या हत्येचा बदला (women revenge) घेण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याशी लग्न केले आणि नंतर त्याची हत्या (women married husband killer and killed him) केल्याची एक घटना उघड झाली आहे. काय आहे प्रकरण? पाकिस्तानमधील (Pakistan) कबयाली भागातील बजौरमधील ही घटना आहे. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पतीचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. आपल्या पतीचा मृत्यू हा नैसर्गिक कारणामुळे झाला की त्याची हत्या झाली हे सुरुवातीला त्या महिलेला माहिती नव्हते. आपल्या पतीला त्याचा मित्र गुलिस्तान खान याने विषारी इंजेक्शन देऊन मारल्याची माहिती या महिलेला समजली. त्यानंतर तिने सुरुवातीला गुलिस्तानला मारण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर तिने गुलिस्तानसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वादग्रस्त TikTok वर दिसणार पाकिस्तानचे अध्यक्ष, 'या' प्रकारचे करणार VIDEO गुलिस्तानचं यापूर्वीच लग्न झाले होते. तसंच त्याला एक मुलगाही आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या लग्नाला तयार करण्यासाठी महिलेनं तिच्याजवळच्या संपत्तीचं आमिष दाखवून गुलिस्तानला लग्नासाठी तयार केले. लग्नानंतर रात्री तो झोपलेला असताना त्याची गोळ्या झाडून हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर हे कृत्या दुसऱ्याच व्यक्तीनं केल्याचा दावा महिलेनं केला होता. मात्र पोलिसांच्या तपासणीमध्ये तिने अखेर सत्य सांगितले. आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी  गुलिस्तानशी लग्न करुन त्याची हत्या केल्याची कबुली महिलेनं दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Murder, Pakistan, Viral

    पुढील बातम्या