अॅडीलेड, 16 जानेवारी: एखादा सळसळता साप जमिनीवर पाहिला तरी हृदयाचे ठोके चुकतात. अशावेळी जगातील सर्वात विषारी सापाचं प्रायवेट स्विमिंगपूलमध्ये दिसणं याची कल्पनाही करवत नाही. पण एक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका परिवाराच्या घरगुती स्विमिंगपुलमध्ये जगातला सर्वात विषारी साप पाहायला मिळाला आहे. यावेळी एक छोटीशी चुकही त्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवावर बेतणारी होती. या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
संबंधित घटना ऑस्ट्रेलियातील आहे. ऑस्ट्रेलिया हा देश नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण देश आहे. या देशात जंगलांची संख्याही तितकीच आहे. त्यामुळे या भागात विविध प्रकारचे जीव आढळतात. त्यामुळे वनजन्य भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. पण अशाप्रकारचा विषारी साप थेट स्विमिंगपूलमध्ये दिसणं हे नवीन आहे. हा साप भुऱ्या रंगाचा असल्याने या सापाला पूर्वी भूरा साप म्हटलं जातं. हा सांप जगातील सर्वात विषारी सांपाच्या यादीत गणला जातो.
स्नेक कॅचर्स अॅडीलेड या व्यवसायिक प्रशिक्षित साप पकडणाऱ्या समुहाने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. स्नेक कॅचर्स अॅडीलेडने (Snake Catchers Adelaide) या सांपाचा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, "या सुंदर पूर्वी भुऱ्या सापाने आज मॅरिनोमध्ये उष्णतेत थंडगार छान जागा शोधली. पण हा सांप घरगुती स्विंमिंगपुलमध्ये आढळला हे खूप भयानक होतं. हा व्हिडिया सध्या प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत हा व्हिडियो जवळपास पंधरा हजार जणांनी पाहिला आहे.
या सर्पदंश केल्यानंतर काही क्षणांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो
ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये इतर सांपाच्या तुलनेत या सापाची प्रजाती जास्त प्रमाणात आढळली जाते. या सांप दिसल्यानंतर थोडीशीही गडबड जाणवली तर स्वतः च्या बचावासाठी हा सांप सर्पदंश मारू शकतो. या सापाच्या विषामुळे लोकांना अर्धांगवायू आणि शरीरात अनियंत्रित रक्तस्त्राव होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.