भोपाळ, 2 डिसेंबर: अधिकाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी (Workers presented shoe garland to the officer on his retirement) चपलांचा हार भेट दिल्याची घटना समोर आली आहे. आपल्या कनिष्ठांसोबत सतत वाईट वागणाऱ्या आणि त्यांचा सतत अपमान करून केवळ स्वार्थ साधणाऱ्या अधिकाऱ्याला (Anger of workers) कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ज्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याला गाठलं आणि त्याला चपलांचा हार प्रदान केला, त्यावेळी कर्मचाऱ्यांचे (Officer says thank you) धन्यवाद करण्याऐवजी इतर कुठलाच पर्याय अधिकाऱ्यापुढे उरला नव्हता.
Rewa: अवधेश प्रताप सिंह विश्वविद्यालय के डिप्टी रजिस्ट्रार से उनके रिटायरमेंट पर बदसलूकी की गई. यूनिवर्सिटी के कर्मचारी यूनियन के पदाधिकारियों ने डिप्टी रजिस्ट्रार को जूते की माला भेंट की और मुर्दाबाद के नारे लगाए. जवाब में डिप्टी रजिस्ट्रार सिंह ने उन्हें Thank you कहा. pic.twitter.com/BJYYofn3s9
— Nikhil Suryavanshi (@NikhilEditor) December 2, 2021
काय आहे प्रकरण?
मध्यप्रदेशातील रिवामध्ये असणाऱ्या अवधेश प्रताप सिंह विद्यापीठात डेप्युटी रजिस्ट्रार पदावरून लाल साहब सिंह हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निवृत्तीनिमित्त विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. आपल्या हयातीत सतत कर्मचाऱ्यांसोबत वाईट वर्तणूक करणारे आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान कसं होईल, असे डावपेच आखणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. शिवाय यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि चांगलं काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याचा सत्कार संस्थेनं आयोजित केला नव्हता. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना वेगळी वागणूक आणि वाईट अधिकाऱ्यांचा सत्कार या संस्थेच्या धोरणावर कर्मचारी नाराज होते. त्यातूनच त्यांनी या अधिकाऱ्याला चपलांचा हार देत निषेध करण्याचा निर्णय़ घेतला.
हे वाचा- भारताचा असा शेजारी देश जिथं कोणीही बेघर नाही की उपाशी नाही!
अधिकारी म्हणाले थँक यू
निरोप समारंभानतर लाल साहब सिंह हे कुलगुरूंना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेले. त्यावेळी कर्मचारी केबिनबाहेर त्यांची वाट पाहत उभे होते. ते बाहेर आल्यानंतर कर्मचारी पुढं सरसावले आणि त्यांनी चपलांना हार त्यांना बहाल केला. त्यावेळी सिंह यांनीदेखील तो हार स्विकारत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अधिकाऱ्याचा हा निर्लज्जपणा पाहून कर्मचारी अधिकच संतापले आणि त्यांनी थेट घोषणाच द्यायला सुरुवात केली. मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पाठ फिरवून निवृत्त अधिकारी तिथून निघून गेले. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे अशीच वागणूक देणार असल्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Employment, Madhya pradesh, Video viral, Worker