मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! आता प्रायव्हेट पार्टलाही करू शकतो लॉक; ही अनोखी अंडरवेअर पाहिलीत का?

काय सांगता! आता प्रायव्हेट पार्टलाही करू शकतो लॉक; ही अनोखी अंडरवेअर पाहिलीत का?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लॉक असलेल्या या अंडरवेअरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Delhi, India

  नवी दिल्ली, 01 एप्रिल : तशी दररोज नवनवीन फॅशन येत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचा ट्रेंड येतो. अगदी अंडरगार्मेंट्सही किती तरी प्रकारचे पाहायला मिळतील. सध्या असंच एक अंडरगार्मेंट चर्चेत आलं आहे. एका अंडरवेअरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ही अंडरवेअर इतर अंडरवेअरपेक्षा खूपच वेगळी आहे. या अंडरवेअरला लॉक आहे. म्हणजे ही अंडरवेअर घालून तुम्ही तुमचा प्रायव्हेट पार्ट लॉक करू शकता.

  लॉक असलेल्या या अंडरवेअरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका मॉडेलने या अंडरवेअरसह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अंडरवेअरला खरंच टाळं आणि चावी आहे. अंडरवेअरच्या पोटाकडील भागावर एक लॉक आहे. टाळ्याला चावी लावली ही अंडरवेअर लॉक होते आणि मग चावीशिवाय कुणी हे लॉक उघडूच शकत नाही.

  आता ही अंडरवेअर पाहिल्यानंतर पार्टनरवर संशय घेणाऱ्या लोकांच्या डोक्यात याचा वापराबाबत वेगळंच काहीतरी शिजलं असेल. पण खरंतर वेगळ्या कारणासाठी ही अंडरवेअर आहे.

  कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

  ज्या कंपनीने ही अंडरवेअर तयार केली आहे, तिने एका एका खास उद्देशाने बनवल्याचं म्हटलं आहे. फॅशन नोव्हाने डिझाइन केलेली ही अंडरवेअर. त्यांच्या मते, ही अंडरवेअर  बेडरूममध्ये रोमान्सला स्पाइस अप करण्यासाठी ही अंडरवेअर तयार करण्यात आली आहे.

  ही अंडरवेअर दोन रंगात उपलब्ध आहे, एक काळा आणि दुसरी गुलाबी. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या हटके अंडरवेअरची किंमत किती. ही अंडरवेअर 35 युरो म्हणजे जवळपास साडेतीन हजार रुपयांची आहे.

  ऐकावं ते नवल! तुमच्या प्रायव्हेट पार्टचा कारशी संबंध; संशोधनातून अजब माहिती समोर

  या अंडरवेअरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्याला पाचपैकी पाच रेटिंग दिले आहेत. एका युझरने तर हा आतापर्यंतचा आपला सर्वात फेव्हरेट ड्रेस असल्याचं म्हटलं आहे. या अंडरगार्मेंटच्या कापडाची क्वालिटीही बहुतेकांना आवडली आहे.

  तुम्हाला हे अंडरगार्मेंट कसं वाटलं? यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle, PRIVATE part, Viral