Home /News /viral /

प्रसूतीनंतर वजन कमी करणं पडलं महागात; थेट जावं लागलं ‘आयसीयू’मध्ये

प्रसूतीनंतर वजन कमी करणं पडलं महागात; थेट जावं लागलं ‘आयसीयू’मध्ये

वजन वाढण्यास खाणंपिणं कारणीभूत असल्याने अनेकजण डाएट (Diet) करतात, म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवतात. मात्र, हाच प्रयोग एका महिलेला महागात पडला आहे.

नवी दिल्ली, 24 जून : कोविड काळात लॉकडाउन झाला. त्यामुळे सगळेच घरात बसून होते. जवळजवळ दोन वर्ष कोविड विषाणूने सगळ्यांना जणून नजरकैदेतच ठेवलं होतं. त्यामुळे अनेकांच्या वजनांत वाढ झाली आणि वाढतं वजन एक मोठी समस्या होऊन बसली. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यापासून व्यायाम, वेगवेगळे काढे, आणि औषधंही घेतली जात आहेत, खास वजन कमी (Weight Loss) करण्याचा दावा करणारा एक व्यवसायही कार्यरत झाला आहे. वजन वाढण्यास खाणंपिणं कारणीभूत असल्याने अनेकजण डाएट (Diet) करतात, म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवतात. मात्र, हाच प्रयोग एका महिलेला महागात पडला आहे. तिला हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात दाखल करण्याची वेळ आली. कोणताही सल्ला न घेता, मागचा पुढचा विचार न करता स्लिम (Slim) होण्यासाठी या महिलेने वर्षभर डाएट केलं आणि तब्बल 40 किलो इतकं वजन कमी झालं, आणि तिचं शरीर कमकुवत झालं असून हाडं दिसू लागली आहेत. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. चीन मधील हेबाई प्रांतातील ही महिला 30 वर्षांची असून, तिची उंची 165 सेमी तर वजन 65 किलो होते. मात्र, तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये स्लीम असणं हा महिलेसाठी सौंदर्याचा एक महत्त्वाचा क्रायटेरिया मानला जातो. हेही वाचा  - 'स्वर्गापासून पाताळापर्यंत शोधा पण 'भगवान'ला हजर करा'; कोर्टाने का दिला असा अजब आदेश? चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने वर्षभरापूर्वी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी तिचे वजन 65 किलो झाले होते. त्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला न घेताच वर्षभर डाएट केलं, आणि तिचं वजन तब्बल 40 किलोने घटून 25 किलो झालं. तिला 'इटिंग डिसऑर्डर'(Aniruddha Nervosa) हा आजार झाला. या महिलेचे वजन कमी झालंच पण तिला अनेक शारीरिक आणि मानसिक आजारही झाले आणि उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ही महिला इटिंग डिसऑर्डर या गंभीर आजाराने ग्रस्त असून कडक डाएट केल्याने ही समस्या झाली आहे. ती इतकी कमकुवत झाली आहे की, तिच्या शरीरातील अनेक अवयव निकामी होत चाललेत, तिचे केसही गळू लागलेत, पोटाच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात, त्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. या महिलेने डाएट बरोबरच एक्सट्रिम वेट लॉस मेथडही वापरल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वजन कमी करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच, डाएट करणं आवश्यक आहे. तुम्हीही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.
First published:

Tags: Lifestyle, Viral

पुढील बातम्या