Home /News /viral /

सुंदर दिसण्याच्या नादात भलतंच घडलं; ब्यूटी ट्रिटमेंटमुळे ओठांचा झाला भयंकर 'फुगा'

सुंदर दिसण्याच्या नादात भलतंच घडलं; ब्यूटी ट्रिटमेंटमुळे ओठांचा झाला भयंकर 'फुगा'

ब्यूटी ट्रिटमेंट कधी जबरदस्त काम करतात, तर कधी बिघडल्या तर भयानक रुप देतात. अशी एक घटना एक महिलेसोबत घडली आहे. महिलेने ओठांची ट्रिटमेंट केल्यानंतर त्याचा उलटाच परिणाम झाला आहे.

  नवी दिल्ली, 10 एप्रिल : ब्यूटी ट्रिटमेंट कधी-कधी अतिशय सुंदर काम करतात. तर काही वेळा त्या पूर्णपणे फसल्याच्या अनेक घटना समोर आहेत. ब्यूटी ट्रिटमेंट कधी जबरदस्त काम करतात, तर कधी बिघडल्या तर भयानक रुप देतात. अशी एक घटना एक महिलेसोबत घडली आहे. महिलेने ओठांची ट्रिटमेंट केल्यानंतर त्याचा उलटाच परिणाम झाला आणि हे पाहून ती स्वत: देखील अतिशय घाबरली आहे. कॉस्मेटिक ट्रिटमेंटमुळे अनेक सेलेब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर्स चेहऱ्यावर, शरीरावर वेगवेगळे प्रयोग करतात. कधी मनाप्रमाणे परिणाम मिळतात, तर कधी ट्रिटमेंट पूर्णपणे फेल होते. टिकटॉकवर syddyliciousxoxo नावाने ओळख असलेल्या महिलेने केलेल्या लीप फीलरने (Lip Filler) भयंकर रिझल्ट दिला आहे. या ट्रिटमेंटनंतर तिचे ओठ फुग्याप्रमाणे फुगले आहेत. महिलेने लीप फीलर केलं. पण तिने हे लीप फीलर डिजॉल्व्ह करण्याचा प्लॅन केला. पण यानंतर जो रिझल्ट आला त्याने तिला मोठा धक्काच बसला. डिजॉल्व्ह इंजेक्शनने संपूर्ण चेहरा बिघडवला. ओठ आधीपेक्षा अधिक मोठे दिसू लागले. तिच्या ओठांचा आकार इतका बदलला की तिला त्यावर विश्वासच बसत नव्हता की असं काही होऊ शकेल. तिचे ओठ खऱ्या आकारच्या ओठांहून पाच पट अधिक मोठे झाले.

  हे वाचा - Expired Beauty Products चा इतका खतरनाक परिणाम; महिलेचा चेहरा पाहूनच हादराल

  Lip filler Dissolve अॅलर्जी - Lip filler जास्त झाल्याने आकार वाढल्याचं समजू शकतं. परंतु Lip filler Dissolve ट्रिटमेंटने असा झालेला परिणाम धक्कादायक आहे. महिलेला Lip filler Dissolve ने अॅलर्जी झाली आणि कधीही असं होऊ नये अशीच घटना घडली. महिलेने ब्यूटी ट्रिटमेंटचा हा परिणाम सोशल मीडियावर शेअर केला. तिने आधी आणि नंतर असे फोटो युजर्ससह शेअर केले. हे फोटो पाहून अनेक जणांना धक्काच बसला आहे. Lip filler Dissolve मुळे झालेल्या अॅलर्जीने महिलेच्या चेहऱ्याचं संपूर्ण रुपच बदललं असून अशा ट्रिटमेंट किती धोकादायक असू शकतात याचा अंदाज लावता येऊ शकतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Photo viral

  पुढील बातम्या