रायपूर, 21 सप्टेंबर : महिलांना पुरुषांनी त्रास देणं, त्यांची छेड काढणं, पाठलाग करणं, मारहाण करणं… अशी एक ना दोन कितीतरी प्रकरणं आहेत. यावेळी महिलांवरील अन्यायाविरोधात आवाजही उठवला जातो. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात महिलांनी एका पुरुषासोबत असं काही केलं आहे, ज्यामुळे त्या पुरुषाविरोधात नव्हे तर महिलांविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स महिलांवर भडकले आहेत. छत्तीसगढच्या रायपूरमधील ही घटना. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत बऱ्याच महिलांनी एका तरुणाला घेरल्याचं दिसतं. चारही बाजूंनी त्याला घेरून या महिला ग्रुपने एकट्या तरुणाला मारहाण करत आहेत. व्हिडीओत पाहू शकता महिलांच्या गटाने एका व्यक्तीला घेरलं आहे. त्याला चारही बाजूंनी मारहाण करत आहेत. काही वेळाने काही महिला बाजूला होतात. पण एक महिला मात्र त्याला शेवटपर्यंत मारत राहते. हे वाचा - एका बॉयफ्रेंडसाठी 2 गर्लफ्रेंडचा राडा! एकमेकींच्या जीवावर उठल्या; काय झाला शेवट पाहा VIDEO मारहाण करता करता त्या व्यक्तीचं शर्टही या महिलांनी फाडून टाकलं आहे. दिनेश घाबरून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण या महिला पुन्हा त्याला पकडतात. यानंतर त्याला बेल्टने मारहाण केल्याचंही सांगितलं जातं आहे. पण ते या व्हिडीओत दिसत नाही आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ज्या व्यक्तीला मारहाण केली जाते आहे त्या व्यक्तीचं नाव दिनेश आहे. तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. विमानतळाजवळील राहुल ट्रॅव्हल कंपनीसोबत तो काम करतो. कंपनीकडून मे आणि जून महिन्याचा पगार त्याला मिळाला नव्हता. त्यामुळे मॅनेजरला भेटायला म्हणून तो गेला. तेव्हा कंपनीकडून पगार मिळाला नाहीच पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अशी वागणूक दिली. दिनेशने मॅनेजरचा फोन नंबर मागितला तेव्हा कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारलं.
#Raipur #AAI @aairprairport @RaipurPoliceCG
— Chandrashekhar Dewangan (@chandrak0809) September 18, 2022
What is happening in the airport, where is the security of airport....? Really shameless some girls are beating one person freely...?
Hopefully Raipur Police will take strict action against such incident. pic.twitter.com/wxQcn1G3cC
तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. पण या व्यक्तीच्या मदतीला कुणीही पुढे आलं नाही. हे वाचा - Shocking Video - बंद गाडीसमोर चुकूनही उभं राहू नका; भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद महिलांच्या या अशा वागणुकीबाबत नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. तिथं फक्त बघ्याची भूमिका घेणारे आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांनी मदत का केली नाही, अशी विचारणा केली आहे. जर त्याने काही चूक केली असेल तर संबंधित प्रशासनाकडे रितसर तक्रार करायला हवी होती. असं म्हटलं आहे. तसंच एअरपोर्ट प्रशासनाने काहीच कसं केलं नाही, याबाबतही संताप व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार दिनेशने कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.