नवी दिल्ली 11 जून : दररोज अंघोळ करावी असं सांगितलं जातं. काही लोक ज्यांना अंघोळीचाही कंटाळा येतो किंवा काही लोक इतर काही कारणांमुळे एखाद दिवस अंघोळ करत नाहीत. पण फार फार अंघोळ न करता तुम्ही किती दिवस राहू शकता? एक-दोन-तीन दिवस… पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल अशा महिला ज्या आयुष्यातून फक्त एकदाच अंघोळ करतात. त्या कपडेही धूत नाहीत. ही अजब अशी प्रथा आहे. महिलांनी आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करण्याची ही विचित्र अशी परंपरा आहे आफ्रिकेतील एका आदिवासी जमातीची. नामिबियामध्ये राहणारी हिम्बा जमात. या जमातीतील महिला त्यांच्या आयुष्यात एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर त्या कधीच अंघोळ करत नाही. ज्या दिवशी त्या अंघोळ करतात तो दिवस त्यांच्या लग्नाचा दिवस असतो. त्यांना आपले कपडेही धुता येत नाहीत. कारण त्या पाण्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्यांना पाण्याला हात लावण्यास मनाई आहे. Weird Tradition : आधी बायकोची ‘लाथ’ मगच नवऱ्याला मिळतं जेवणाचं ताट; इथं आहे ही अजब परंपरा आता आपण एक दिवस अंघोळ केली नाही तर शरीराला इतकी दुर्गंधी येते की सहनही होत नाही. त्वचेवर इन्फेक्शनचा, आजारांचाही धोका असतो. विचार करा या महिला आयुष्यभर अंघोळच करत नाहीत, त्यांचं काय? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. अंघोळ करत नसल्या तरी या महिलांच्या शरीराला दुर्गंधी येत नाही. त्यांचं शरीर स्वच्छ असतं, त्यांना अंघोळ न केल्याने कोणता आजार होत नाही. याचं कारण म्हणजे पाणी नसलं तरी एका खास पद्धतीने त्या आपल्या शरीराची काळजी घेतात. Weird tradition : ऐकावं ते नवल! इथं चक्क माणसाच्या प्रायव्हेट पार्टची केली जाते पूजा या महिला स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष औषधी वनस्पतींची वाफ घेतात. त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येत नाही. याशिवाय प्राण्यांची चरबी,लोह, हेमॅटाइटसारख्या खनिज घटकांपासून खास लेप तयार करून त्या शरीरावर लावतात. यामुळेचं त्यांचं शरीर लाल होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.