कित्येक देश असे आहेत जिथं विचित्र प्रथा, परंपरा आहेत. अजब गजब फेस्टिव्हल आयोजित केले जातात. पण तुम्ही पेनिस फेस्टिव्हलबाबत ऐकलं आहे का? प्रतीकात्मक फोटो - Canva
पेनिस फेस्टिव्हल ज्यात चक्क माणसाच्या प्रायव्हेट पार्टची पूजा केली जाते. मानवी लिंगपूजेचा हा मोठा असा उत्सव होतो. ज्याला कानामारा उत्सव म्हणून ओळखलं जातं. (फोटो - ट्विटर)
दरवर्षी 15 मार्च रोजी पुरुषाच्या लिंगाची पूजा करण्यासाठी भव्य समारंभ आयोजित केला जातो. या दरम्यान लोक मोठ्या संख्येने येथे सामील होतात आणि या सोहळ्याचा भाग बनतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व सहभागी होतात. (फोटो - ट्विटर)
या उत्सवात मुलींकडून लिंगाची आकृती तयार केली जाते, ज्याचं वजन सुमारे 280 किलो असते. हे लिंग बनवल्यानंतर ते संपूर्ण शहरात फिरवलं जातं. त्यानंतर त्याची मंदिरात त्याची प्रतिष्ठापना करतात आणि वर्षभराने त्याचं विसर्जन करतात. (फोटो - ट्विटर)
हा विचित्र फेस्टिव्हल होतो, जपानमध्ये. जपान टेक्नॉलॉजी आणि हार्ड वर्किंगसाठी फेमस आहे. पण इथल्या लिंग महोत्सवाचीही बरीच चर्चा असते. (फोटो - ट्विटर)