• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Girlfriend साठी पतीनं दिला धोका, आपलंच दुःख विकून पत्नी झाली मालामाल

Girlfriend साठी पतीनं दिला धोका, आपलंच दुःख विकून पत्नी झाली मालामाल

गर्लफ्रेंडसाठी पतीनं धोका (Woman writes her breakup story and earns name and fame) दिल्यानंतर त्यावर पुस्तक लिहून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या लेखिकेची सक्सेस स्टोरी सध्या अनेकांच्या तोंडी आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 10 नोव्हेंबर: गर्लफ्रेंडसाठी पतीनं धोका (Woman writes her breakup story and earns name and fame) दिल्यानंतर त्यावर पुस्तक लिहून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या लेखिकेची सक्सेस स्टोरी सध्या अनेकांच्या तोंडी आहे. पतीने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी (Husband cheated wife for girlfriend) पत्नी धोका दिला. त्यानंतर पत्नीला मानसिक त्रास देत तिने आपल्याला सोडून जावं, यासाठी बनावही रचला. मात्र त्यामुळे खचून न जाता पत्नीनं या (created new world out of grief) दुःखातून नवं विश्व उभं करण्याचा निर्णय घेतला. गर्लफ्रेंडसाठी दिला धोका ही गोष्ट आहे अमेरिकेन लेखिका गॅब्रिएला स्टोन यांची. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं एका 19 वर्षांच्या मुलीवर प्रेम जडलं. आपल्या गर्लफ्रेंडचा फोटो त्याने थेट लिव्हिंग रुममध्ये लावला. गॅब्रिएला यांना डिवचण्याच्या हेतूने त्याने केलेल्या या कृत्याला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देण्याचा निर्णय गॅब्रिएला यांनी घेतला. Gabrielle_stone या टिकटॉक अकाउंटवरून त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. पुस्तकातून मांडलं दुःख आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते त्यांनी एका पुस्तकात लिहिलं. या पुस्तकात पतीच्या नावासह आपली कहाणी त्यांनी लिहिली. बघता बघता हे पुस्तक लोकप्रिय झालं आणि त्याच्या हजारो प्रति खपल्या. या पुस्तकाचे वाचक इतके भारावून गेले आणि गॅब्रिएल यांची लोकप्रियता त्यामुळे कैक पटींनी वाढली. त्याचे टिकटॉक आणि इतर सोशल मीडियावरील फॉलोअर्सही प्रचंड वाढले आणि त्यांचं लिखाण डोक्यावर घेतलं जाऊ लागलं. आतापर्यंत त्यांच्या गोष्टीला 26 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून 14 हजारपेक्षा अधिक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा- पाकिस्तानमधील मूर्खपणाचे अजब किस्से, PHOTOS देतायत बावळटपणाची साक्ष दुःखाला बनवली ताकद आपल्या दुःखाला उगाळत न बसता त्यातून काहीतरी सकारात्मक करण्याची ऊर्मी कशा प्रकारे एखाद्याचं करिअर घडवू शकते, हेच गॅब्रिएल यांच्या उदाहरणातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्यातही असेच अनुभव आल्याचे किस्से शेअर केले, तर अनेकांनी गॅब्रिएलला आपला नैतिक पाठिंबा जाहीर करत आपला लढा सुरूच ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  Published by:desk news
  First published: