नवी दिल्ली 09 एप्रिल : कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण अभ्यासासोबतच मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असतो. अनेकवेळा तरुण-तरुणी अशी कृत्ये करतात जी त्यांच्यासाठी सामान्य असतात, परंतु जेव्हा इतरांना त्यांच्याबद्दल कळतं तेव्हा सगळेच थक्क होतात. अलीकडेच एका महिलेनं तिच्या कॉलेजच्या दिवसांत केलेली मजा आठवत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या विचित्र कृत्याबद्दल ऐकून नेटकरीही थक्क झाले. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॅककॉल ब्रॉक नावाच्या महिलेने तिच्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने कॉलेज लाइफशी संबंधित मजेदार गोष्टींचा उल्लेख केला आहे. मात्र लोकांना तिने सांगितलेली ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं की ती सलग 16 दिवस वेगवेगळ्या मुलांसोबत डेटवर गेली होती (Woman Wet on Dinner date with Strangers for Free Food). हे तिने फक्त मोफत जेवण खाण्यासाठी केलं होतं. पारदर्शक डोक्यावर असणाऱ्या डोळ्यातून पाहतो जग! Viral होतोय या विचित्र माशाचा Photo मॅककॉलने सांगितले की जेव्हा ती कॉलेजमध्ये होती आणि तिचे पैसे संपले होते. तिच्याकडे जेवणासाठीही पैसे शिल्लक नव्हते. त्यावेळी ती डेटिंग अॅप्सची मदत घेत असे. डेटिंग अॅप्सद्वारे ती अनोळखी मुलांना भेटायची आणि त्यांच्यासोबत डिनर डेटवर जायची. अशाप्रकारे तिचं पोटही भरायचं आणि ती डेटिंगही करायची. तिने सांगितलं की, एकदा ती सलग 16 दिवस वेगवेगळ्या मुलांसोबत डिनर डेटवर गेली होती.
महिलेच्या या कृत्याला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण या कृतीला तिची हुशारी सांगत आहेत. लोक म्हणाले की ती खूप हुशार आहे. पण दुसरीकडे महिलेला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ती मुलांच्या भावनांशी खेळत होती आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्यांचा वापर करत होती असंही काही लोकांचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्याने पगाराबद्दल बॉसला विचारला एक साधा प्रश्न; काही सेकंदान नव्या नोकरीवरुन काढून टाकलं एका व्यक्तीने लिहिलं की, यामुळे तो डिनर डेटवर स्वत: पैसे देत नाही. एका महिलेने सांगितलं की, तिने मुलांसोबत असं कधीच केलं नाही, कारण तिच्या नजरेत याला मुलांचा वापर करणं म्हणतात. जेव्हा महिलेला जास्तच ट्रोलिंगचा सामना करावा लागला तेव्हा तिने कमेंटमध्ये लिहिलं की त्या सर्व मुलांनी तिला स्वतःहून डिनर डेटसाठी बोलावलं होतं.