Home /News /crime /

Big News: टिफिन बॉम्बचा जोरदार स्फोट, खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू

Big News: टिफिन बॉम्बचा जोरदार स्फोट, खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू

खेळत असताना समोर दिसणारा टिफिन मुलाने उचलला आणि जोरदार धमाका होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.

    भागलपूर, 13 डिसेंबर: 7 वर्षांचा मुलगा (7 year old boy) खेळत असताना (Playing) त्याला दिसलेला टिफिन (Tiffin bomb) त्याने उचलला आणि त्याक्षणी जोरदार स्फोट (Major blast) झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की त्यात मुलाला आपले प्राण (7 year old died) गमवावे लागले. घराबाहेर खेळणारी मुलं अनेकदा त्यांना दिसणाऱ्या गोष्टींना हात लावतात. मुलांना उत्कंठा निर्माण होते आणि एखादी नवी गोष्ट नेमकी काय आहे, हे पाहण्यासाठी ते अनोळखी वस्तूही उचलून घेतात. मात्र एका टिफिनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. अशी घडली घटना बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे. काही लहान मुलं रस्त्यावर खेळत होती. त्यात 7 वर्षांचा अमृत कुमार दास नावाचा मुलगाही होता. खेळता खेळता मुलांना जवळच एक टिफिन ठेवल्याचं दिसलं. नवा दिसणारा हा टिफिन नेमका कुणाचा आहे आणि त्यात काय ठेवलं असावं, याची उत्कंठा निर्माण झाल्यामुळे अमृत जवळ गेला आणि त्याने डबा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने डबा उचलल्यानंतर काही क्षणांतच जोरदार स्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. जोरदार धमाक्यानंतर अमृत तिथून उडून बाजूला जाऊन पडला आणि त्याला अनेक जखमा झाल्या. बॉम्बच्या काचा आणि खिळे त्याच्या शरीरात घुसले आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन पडला. मुलाचा मृत्यू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमृतला पाहून काही वेळ नेमकं काय घडतंय याची कुणाला कल्पनाही येत नव्हती. अमृतला तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचारारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हे वाचा- आईला आपल्याच मुलाची वाटते घृणा, कारण वाचून कुणालाही येईल दया स्फोटांचं सत्र सुरूच भागलपूरमध्ये या अगोदरदेखील अशाच प्रकारे स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहे. गेल्याच आठवड्यात भागलपूरमध्ये दोन स्फोट झाले होते. मात्र त्या स्फोटांबाबतही अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाही. हे स्फोट नेमकं कोण घडवून आणत आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Bomb Blast, Boy

    पुढील बातम्या