मुंबई, 20 फेब्रुवारी : स्रीचं आयुष्य हे मुलगी, बहिण, पत्नी आणि आई अशा विविध भूमिकांनी नटलेलं असतं. त्यातल्या त्यात ‘आई’ होण्याइतकं सुख कशातच नसतं. आई झाल्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. त्यामुळं स्त्रिया आई होणार हे कळताच प्रचंड खुश होतात. अशाच एका महिलेनं मी गरोदर आहे ही आनंदाची बातमी अनोख्या पद्धतीनं आपल्या पतीला सांगितली. तिला सुचलेली ही युक्ती पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल. तिनं चक्क लॉटरीच्या तिकिद्वारे ही आनंदाची बातमी जाहिर केली. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव हेली बेज असं आहे. तिनं सर्वप्रथम आपली प्रेगनंसी टेस्ट केली. तिच्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच ती प्रचंड खुश झाली. आता ही बातमी हेलीला तिच्या पतीला सांगायची होती. परंतु तिने मी आई होणार आहे, तू बाबा होणार आहे वगैरे अशी पारंपारिक वाक्य न उच्चारता एक अनोखी शक्कल लढवली. तिनं चक्क लॉटरीची दोन तिकिट तयार करुन घेतली. हे लाखो रुपयाचं लॉटरीचं तिकिट आहे. हे स्क्रॅच कर कदाचित आपण मालामाल होऊ शकतो असं म्हणत तिनं ते तिकिट आपल्या पतीकडं दिलं. त्याने देखील फार आढेवेढे न घेता ते तिकिट स्क्रॅच केलं. अन् त्यामध्ये लवकरच तू बाबा होणार आहेस असा मेसेज लिहिलेला होता. हा मेसेज वाचताच सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्यानंतर तो देखील हेलासोबत आनंदाच्या भरात नाचू लागला.
अवश्य पाहा - धक्कादायक! मनोरंजन विश्वात आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका TV अभिनेत्याने संपवलं जीवन
या महिलेने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद करुन तो व्हिडीओ युट्यूबवर देखील शेअर केला. हेली ही एक प्रसिद्ध ब्लॉगर आणि युट्यूबर आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. या पार्श्वभूमीवर तिचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होता आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत हेलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cute couple, Good news, International, Marriage, Pregnancy, Viral video.