Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अ‍ॅडल्ट मॉडेलनं भलत्याच ठिकाणी गोंदवला बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू; ब्रेकअपनंतर झाली फजिती

अ‍ॅडल्ट मॉडेलनं भलत्याच ठिकाणी गोंदवला बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू; ब्रेकअपनंतर झाली फजिती

टॅटू गोंदवल्यानंतर एकाच आठड्यात काजुमीला समजलं की तिच्या बॉयफ्रेंडचं ऑफिसमधील एका महिलेसोबत अफेअर आहे. हे समजताच तिला धक्का बसला

टॅटू गोंदवल्यानंतर एकाच आठड्यात काजुमीला समजलं की तिच्या बॉयफ्रेंडचं ऑफिसमधील एका महिलेसोबत अफेअर आहे. हे समजताच तिला धक्का बसला

टॅटू गोंदवल्यानंतर एकाच आठड्यात काजुमीला समजलं की तिच्या बॉयफ्रेंडचं ऑफिसमधील एका महिलेसोबत अफेअर आहे. हे समजताच तिला धक्का बसला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : प्रेमात माणूस अंधळा होतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अनेकदा प्रेमात माणूस असं काही करून जातो, ज्याचा त्यानं आधी कधी विचारही केलेला नसतो. लोक प्रेमात एकमेकांसाठी अगदी चंद्र अन् चांदण्या तोडून आणण्याची वचनं देतात. मात्र, जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. असंच काहीसं एका अमेरिकी महिलेसोबत घडलं. तिनं आपल्या शरीराच्या अशा अंगावर बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू गोंदवला (Tattoo of Boyfriend Name) की ब्रेकअपनंतर (Breakup) ती अडचणीत आली.

काजुमी एक अॅडल्ट मॉडेल आहे आणि सोशल मीडियावर तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत. मात्र सध्या काजुमी आपल्या एका मोठ्या चुकीमुळे चांगलीच चर्चेत आहे. डेली स्टार वेबसाईटच्या वृत्तानुसार, काजुमी एका मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्या नावाचा टॅटूही तिनं आपल्या शरीरावर गोंदवला होता. मात्र काही काळातच त्यांचा ब्रेकअप झाला आणि ती अडचणीत आली.

काजुमीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू आपल्या खालच्या ओठावर गोंदवला होता. वेबासाईटसोबत बोलताना काजुमीने सांगितलं की जेव्हा त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा ते साजरं करण्यासाठी तिनं आपल्या ओठावर टॅटू गोंदवला (Tattoo of Boyfriend Name on Lips). मात्र यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आतच तिला समजलं की तिचा बॉयफ्रेंड तिला धोका देत आहे.

याबाबत बोलताना तिनं सांगितलं, की आमच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होणार होतं. यामुळे याच्या एक महिना आधीच मी असा विचार केला की बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यावं. जेव्हा मी त्याला माझा टॅटू दाखवला तेव्हा तो हैराण झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता.

टॅटू गोंदवल्यानंतर एकाच आठड्यात काजुमीला समजलं की तिच्या बॉयफ्रेंडचं ऑफिसमधील एका महिलेसोबत अफेअर आहे. हे समजताच तिला धक्का बसला. आधी मला आणि माझ्या मैत्रिणीला हा टॅटू खूप आवडला होता मात्र आता ब्रेकअपनंतर मला हा टॅटू अजिबातही आवडला नाही. मात्र आता पश्चातापाशिवाय तिच्या हातात काहीच नाही. तिनं सांगितलं की ओठावर टॅटू गोंदवताना अतिशय वेदना झाल्या. मात्र प्रेमात तिनं या वेदनाही सहन केल्या. मात्र आता तिला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. तिला आता हा टॅटू काढायचा आहे. तिचं असं म्हणणं आहे की या टॅटूवर आता ती वेगळी डिझाईन बनवून घेईल जेणेकरून त्याचं नाव दिसणार नाही.

First published:

Tags: Relationship, Shocking news, Tattoo