सिंगापूर 01 जानेवारी : एका महिलेसोबत एक अतिशय भयंकर घटना घडली. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा महिला बाथरूममध्ये गेली होती. ती आतमध्ये जाताच तिने दरवाजा बंद केलं, मात्र यावेळी दरवाजाचा हँडल तुटला. यानंतर दरवाजा उघडलाच नाही. महिलेनं भरपूर प्रयत्न केले, मात्र तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर जे काही घडलं ते सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. मुंबई मेट्रोच्या दरवाजात अडकला ड्रेस; इतक्यात ट्रेनही सुरू झाली, पुढे तरुणीसोबत भयानक घडलं, VIDEO ही घटना सिंगापूरमधील एका शहरातील आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना एका चिनी महिलेसोबत घडली. महिलेचं नाव यांग असल्याचं सांगितलं जात आहे, आणि ती सिंगापूरमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहात होती. ही महिला बाथरूममध्ये गेली असता, तिच्यासोबत ही घटना घडली. यावेळी महिला आपल्यासोबत आपला फोनही आतमध्ये घेऊन गेली नव्हती. बाथरूमचा दरवाजा न उघडल्याने महिला बराच वेळ जोरजोरात ओरडत राहिली. ती मोठमोठ्याने रडूही लागली, मात्र तिथे तिचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. महिलेनं बाथरूममधील सगळ्या वस्तू वरून खाली टाकल्या, मात्र तरीही त्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पहिला आणि दुसरा दिवसही गेला, तरी महिला तिथून बाहेर पडू शकली नाही. ती भुकेनं आणि तहानेनं व्याकुळ झाली होती. असेच चार दिवस गेले. चार दिवस फक्त पाणी पिऊन महिलेनं बाथरूममध्ये स्वतःला जिवंत ठेवलं. चौथ्या दिवशी महिलेच्या आई वडिलांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बऱ्याच वेळा फोन करूनही तो उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी सिंगापूरध्येच राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला फोन केला आणि याबाबत सांगितलं. हे नातेवाईक महिलेच्या घरी पोहोचले, त्यांनी पोलिसांनी बोलावलं आणि दरवाजा तोडून महिलेला बाहेर काढलं. यानंतर बाहेर येताच महिलेनं आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.