जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घरात पाळलेल्या 45 मांजरींचा खर्च झाला डोईजड, महिलेने सुरू केलं विचित्र काम

घरात पाळलेल्या 45 मांजरींचा खर्च झाला डोईजड, महिलेने सुरू केलं विचित्र काम

घरात पाळलेल्या 45 मांजरींचा खर्च झाला डोईजड, महिलेने सुरू केलं विचित्र काम

37 वर्षीय कॅट इंग्लिश एस्कॉर्ट म्हणून काम करते. तिने 18 वर्षाची असतानाच लॅप डान्सर म्हणून काम सुरू केलं. तेव्हा ती हेल्थ आणि सोशल केअरबाबतही अभ्यास करत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 मार्च : जगभरात अनेक असे लोक असतात ज्यांची काम ऐकूनच सगळे थक्क होतात. अनेकदा इतर लोकांना ही कामं चुकीचीही वाटतात, मात्र त्या लोकांना इतरांच्या टीकांचा काहीही फरक पडत नाही. ते फक्त स्वतःसाठी हे काम करत असतात. सध्या इंग्लंडमधील एक महिलादेखील अशाच कारणामुळे चर्चेत आहे. महिला अॅडल्ट इंडस्ट्रीत काम करून पैसे कमावते, मात्र या पैशातून ती अनेक भटक्या मांजरींचा सांभाळ करते (Woman Started Working in Adult Industry for Cats). Yuck! उंटाजवळ जात व्यक्तीचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच उलटी येईल इंग्लंडच्या ईस्ट लँकशायरमध्ये राहणारी 37 वर्षीय कॅट इंग्लिश एस्कॉर्ट म्हणून काम करते. तिने 18 वर्षाची असतानाच लॅप डान्सर म्हणून काम सुरू केलं. तेव्हा ती हेल्थ आणि सोशल केअरबाबतही अभ्यास करत होती. यादरम्यान बारमध्ये लॅप डान्स करून जे पैसे मिळत असे, त्यातून ती रस्त्यावर सापडलेल्या मांजरींची काळजी घेत असे. द सनच्या रिपोर्टनुसार, तिने सांगितलं की ती मांजरींना खाण्यासाठी देण्यातं काम करायची, कारण तिला वाटायचं की त्या भूकेलेल्या आहेत. कॅटने सांगितलं की अनेकदा तिला एका रात्रीतच लाखो रूपये मिळत असत. यातील बहुतेक पैसे ती मांजरींवर खर्च करायची. जेव्हा तिच्या वडिलांचं कार लोनचं कर्ज मिटलं तेव्हा तिने हे काम बंद केलं. मात्र, मांजरींची काळजी घेणं कायम ठेवलं. यानंतर तिने एक रीटेल बिझनेसमध्ये प्रवेश केला. मात्र तिथे तिची कमाई अतिशय कमी होती. यामुळे तिने एस्कॉर्ट बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती ऑस्ट्रेलियाला गेली आणि आपला अॅडल्ट इंडस्ट्रीतील काम सुरू ठेवलं. या पैशातून तिने मांजरांची काळजी घेण्याचं कामही सुरूच ठेवलं.

5 दिवसात 2 वेळा गरोदर राहिली महिला; डिलिव्हरीवेळी मात्र भलतंच घडलं, अजब प्रकरण

आता ती आपल्या बहिणीच्या शिक्षणासाठीही पैसे खर्च करते आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहाते. दोघं 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांच्याकडे 45 मांजरी आहेत. तिची मांजरींसाठी सँक्चरी सुरू करण्याची इच्छा आहे, जेणेकरून तिला अनेक मांजरी सांभाळता येतील. तिने सांगितलं की ती जेव्हा एखाद्या उपाशी मांजरीला बघते, तेव्हा तिला खूप दया येते. ती लोकांना सांगते की ‘प्राण्यांना पाळण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांना मदत करा. त्यांना वेळेवर अन्न मिळालं तर त्यांच्या आयुष्यातही मोठा बदल येऊ शकतो’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cat , porn star
  • First Published :
जाहिरात
जाहिरात