मुंबई 07 जून : अनेकवेळा अशी वस्तू घरात सापडते, जी वर्षानुवर्षेही आपल्याला दिसलेली नसते. असाच काहीसा प्रकार या महिलेसोबतही घडला आहे. तिला तिच्या घरात एक गूढ दरवाजा सापडला. या महिलेचं म्हणणं आहे की ती घराच्या भिंतीवर वॉलपेपर लावत होती, तेव्हा तिला एक रहस्यमयी दरवाजा दिसला. जो आधी कधीच दिसला नव्हता. तिने Reddit वर लिहिलं, ‘वॉलपेपरच्या मागे एक छुपा दरवाजा होता. त्याला हँडल नव्हतं. आत काय आहे हे त्या महिलेला कळेना. तिला वाटलं की, कदाचित तिला इथे कोळीचं जाळं पाहायला मिळेल. पण आत जे दिसलं ते पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, तिला आत असं काही दिसलं, ज्याचा तिने अजिबात विचार केला नव्हता. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘मी कोपऱ्यात एक सांगाडा पाहिला. मी खोटं बोलणार नाही. ते पाहून मला खूप भीती वाटली. मात्र, नंतर असं आढळलं की तो बनावट होता, जो घराच्या जुन्या मालकांनी तिथे सोडला होता. महिलेच्या पोस्टवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत.
एका वापरकर्त्याने म्हटलं की, ‘मला कल्पना करत आहे, की ज्याने या खोलीत हा सांगाडा लपवला असेल तो अजूनही विचार करत असेल की आतापर्यंत कोणी तो पाहिला असेल का? आणखी एका युजरने म्हटलं की, ‘घर विकण्यापूर्वी तुम्ही पुन्हा खोली बंद करा, जेणेकरून तुम्ही ही परंपरा पुढे नेऊ शकता.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, ‘बेडरूममध्ये बेसबोर्डच्या मागे एक नोट ठेवा. इथे खजिना असल्याचं त्यात लिहा, तो खूप शोधेल आणि शेवटी याचा शेवट अतिशय मजेशीर होईल. पुढच्या व्यक्तीला नोट आणि सीक्रेट खोली शोधण्यात किती मजा येईल याचा विचार करा, असं त्याने लिहिलं. दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘ठीक आहे, किमान तुम्ही आनंदी होऊ शकता, की घराचा जुना मालक धोकादायक खोडकर होता आणि तुमच्या घरात कोणीही नाही. तिथे दुष्ट आत्मा नाही. .’

)







