मराठी बातम्या /बातम्या /Viral /लेबर रुममध्ये बाळाला जन्म देत होती महिला, तेवढ्यात आला EX Boyfriend आणि...

लेबर रुममध्ये बाळाला जन्म देत होती महिला, तेवढ्यात आला EX Boyfriend आणि...

प्रेग्नंट महिलेच्या खोलीत अचानक तिचा बॉयफ्रेंड आला. अगोदर तिला धक्का बसला, मात्र लवकरच सत्य समजलं.

प्रेग्नंट महिलेच्या खोलीत अचानक तिचा बॉयफ्रेंड आला. अगोदर तिला धक्का बसला, मात्र लवकरच सत्य समजलं.

प्रेग्नंट महिलेच्या खोलीत अचानक तिचा बॉयफ्रेंड आला. अगोदर तिला धक्का बसला, मात्र लवकरच सत्य समजलं.

वॉशिंग्टन, 19 डिसेंबर: बाळाला जन्म देण्यासाठी (For delivery) हॉस्पिटलच्या (Hospital) लेबर रुममध्ये (Labor room) दाखल झालेल्या महिलेनं जेव्हा त्या अवस्थेत आपल्या एक्स-बॉयफ्रेंडला (Ex-boyfriend) पाहिलं, तेव्हा तिला काय करावं, हेच समजेना. आयुष्यात असे अनेक प्रसंग अचानक उभे ठाकतात, ज्यावेळी माणसं प्रचंड अवघडून जातात. अशा परिस्थितीत कुणाचीही चूक नसते, मात्र परिस्थितीच इतकी विचित्र असते की सर्वांनाच अवघडून जायला होतं. या परिस्थितीत वेळ मारून नेणं एवढाच एक उपाय उरतो. मात्र हा वेळ संपता संपत नाही आणि अशा आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतात.

एक्स-बॉयफ्रेंड आला लेबर रूममध्ये

महिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये दाखल झाली होती आणि तिथं नेमकं काय घडलं, याबाबतचा अनुभव तिने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ‘द सन’ वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार मॅडी सिफेली नावाची महिला हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असतानाच तिचा बॉयफ्रेंड तिच्या खोलीत येताना दिसला. त्याच्यासोबत त्याची पत्नीदेखील होती आणि तीदेखील प्रेग्नंट होती. तिच्या डिलिव्हरीसाठी ते दोघंही हॉस्पिटलमध्ये आले होते. योगायोगानं दोघांनाही एकाच खोलीतील शेजारी शेजारी असणारे बेड अलॉट झाले होते.

महिलेला बसला धक्का

आपला बॉयफ्रेंड आपल्या खोलीत शिरत असल्याचं पाहून सुरुवातीला आपल्याला जबर धक्का बसला. तो नेमका आत्ता इथं का असावा, असा प्रश्न आपल्याला पडला. त्याला काही विचारण्याच्या अवस्थेत आपण नव्हतो. मात्र तेवढ्यात त्याच्यासोबत त्याची प्रेग्नंट पत्नीदेखील रुममध्ये आली. तिच्या पाहिल्यावर आपल्याला नेमकं काय घडतंय, याचा अंदाज आला. त्याची पत्नीदेखील प्रेग्नंट होती आणि तिचीही डिलिव्हरीची वेळ जवळ होती. योगायोगाने आम्ही दोघीनाही एकाच रुममधील शेजारी शेजारी असणारे बेड मिळाले होते, असं या महिलेनं म्हटलं आहे. दोन बेडच्या मध्ये एक पडदा लावण्यात आला होता आणि त्यातून सतत आपली आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत नजरानजर होत होती आणि तो फारच विचित्र अनुभव होता, असं या महिलेनं म्हटलं आहे.

हे वाचा- महिलेनं बाळाच्या हातात दिली केळी; 30 सेकंदातच मृत्यू, कारण वाचून व्हाल शॉक

युजर्सच्या गंभीर प्रतिक्रिया

आपल्यालालाही असे अवघडून टाकणारे अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. अशा प्रसंगी वेळ मारून नेण्याशिवाय इतर कुठलाच पर्याय उरत नाही, असंही एका युजरनं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Girlfriend, Pregnant woman