मराठी बातम्या /बातम्या /Viral /शेरास सव्वाशेर! पतीच्या तिळांवर पत्नीनं केल्या खुणा, डॉक्टरांनी त्यावरच लिहिले Remarks

शेरास सव्वाशेर! पतीच्या तिळांवर पत्नीनं केल्या खुणा, डॉक्टरांनी त्यावरच लिहिले Remarks

आपल्या पतीच्या पाठीवर असणाऱ्या तिळांभोवती तिनं मार्करनं खुणा केल्या आणि डॉक्टरांनीदेखील हीच युक्ती वापरत तिला उत्तर दिलं.

आपल्या पतीच्या पाठीवर असणाऱ्या तिळांभोवती तिनं मार्करनं खुणा केल्या आणि डॉक्टरांनीदेखील हीच युक्ती वापरत तिला उत्तर दिलं.

आपल्या पतीच्या पाठीवर असणाऱ्या तिळांभोवती तिनं मार्करनं खुणा केल्या आणि डॉक्टरांनीदेखील हीच युक्ती वापरत तिला उत्तर दिलं.

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: आपल्या पतीच्या (Husband) पाठीवर (Back) असणाऱ्या तिळांची (Moles) काळजी (Concern) वाटल्यामुळे पत्नीनं (Wife) त्याच्यावर मार्करने खुणा केल्या आणि त्याला डॉक्टरांकडे (Skin specialist) पाठवलं. मात्र डॉक्टरही शेरास सव्वाशेर  ठरले. त्यांनीदेखील कागदावर आपला अभिप्राय देण्याऐवजी त्याच्या पाठीवरच तो नोंदवला आणि त्याला परत पाठवलं. शरीरात काही बदल होत असतील, तर शरीरावर असणाऱ्या तिळांपासून त्याची सुरुवात होते, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण स्वतःच्या आणि स्वतःच्या पार्टनरच्या शरीरावरील तिळांकडं बारीक लक्ष ठेऊन असतात. त्यात थोडा जरी बदल झाल्याचं लक्षात आलं, तरी तातडीनं डॉक्टरांकडे जाण्याची खबरदारी अनेकजण घेतात. नुकत्याच समोर आलेल्या घटनेनुसार एका पत्नीला आपल्या पतीच्या पाठीवर असणाऱ्या तिळांमध्ये अनेक बदल होत असल्याचं जाणवलं आणि तिने त्याला त्वचारोग तज्ज्ञांकडे पाठवण्याचा निर्णय़ घेतला.

पाठीवर केल्या खुणा

आपल्या पतीच्या कुठल्या तिळांबाबत आपल्याला चिंता वाटते, हे डॉक्टरांना समजावं, म्हणून महिलेनं त्याच्या पाठीवरील तिळांभोवती मार्करने गोल करत खुणा केल्या. डॉक्टर जेव्हा आपल्या पतीला तपासतील, तेव्हा नेमक्या कुठल्या तिळांमध्ये बदल झाल्याचं आपल्याला जाणवलं आहे, ते त्यांना नीट समजावं, या उद्देशानं पत्नीनं असं केलं. त्यावर डॉक्टरांनीही डोकं चालवत मार्करनेच त्याला उत्तर दिलं.

असं दिलं उत्तर

डॉक्टरांनीदेखील त्या व्यक्तीच्या पाठीवर मार्करने नोट्स लिहिल्या. ज्या  तिळांभोवती व्यक्तीच्या पत्नीनं खुणा केल्या होत्या, त्याच्याजवळ डॉक्टरांनी आपले शेरे देत अभिप्राय दिला. प्रत्येक तिळावर वेगवेगळे अभिप्राय नोंदवत त्यांनी रुग्णाची पाठ पूर्णतः भरून टाकली. हे पाहून पत्नीला धक्काच बसला आणि आपल्यावर कुणीतरी कडी केल्याच्या भावनेनं हसूदेखील आलं. तिनं सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला आणि पतीच्या पाठीचे फोटोदेखील टाकले.

हे वाचा -

मजेशीर प्रतिक्रिया

मी देखील एक त्वचारोग तज्ज्ञ असून अनेक बायका आपल्या पतीच्या पाठीवरील तिळांभोवती अशाच खुणा करत असल्याची प्रतिक्रिया एकाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवली आहे. तर डॉक्टरांनी ही शक्कल लढवल्यानंतर आता तरी अनेक महिला आपल्या पतीची पाठ माखणं बंद करतील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

First published:
top videos

    Tags: Resident Doctors, Wife, Wife and husband