नवी दिल्ली, 03 एप्रिल : उलटे पाय म्हटलं की आपल्यासमोर सर्वात आधी येतं ते भूत. तसं भूत आहेत नाहीत हा वेगळा वाद. प्रत्यक्षात नाही पण बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही भुतांना पाहिलंच असेल. भूत म्हणजे आपलं डोकं आणि पाय गरागरा फिरवू शकतात, हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे कुणाचे सरळ पाय अचानक उलटे फिरले की त्यांना भूत समजलं जातं. पण अशी उलटे पाय फिरवण्याची भुतांची कला माणसांकडेही आहे, असं तुम्हाला सांगितलं तर… आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. भुतांप्रमाणे माणसंही आपले पाय उलटे फिरवू शकतात. असाच एक माणूस सध्या चर्चेत आला आहे. ही एक महिला आहे, जी आपल्या दोन्ही पायांचे पंजे पूर्णपणे फिरवू शकते. या महिलेचा नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंदवलं गेलं आहे. केल्सी ग्रुब असं या महिलेचं नाव आहे. 32 वर्षांची केल्सी न्यू मेक्सिकोमध्ये राहते. जी तिचे पाय 171.4 अंशापर्यंत फिरवू शकते. म्हणजे पायाचा पुढचा पंजा मागे जाऊ शकतो. जसे भुताचे उलटे पाय दिसतात अगदी तसंच. ओ तेरी! मेणबत्ती विझवण्याचा World Record; असं या व्यक्तीने काय केलं पाहा VIDEO केल्सी म्हणाली माझे पाय खूप लवचिक आहेत, हे मला माहिती नव्हतं. पण इतके लवचिक असतील याची कल्पना नव्हती. बहुतेक लोक त्यांचे पाय फक्त काही अंश फिरवण्यात सक्षम असतात. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की मी 90 अंशापर्यंतच हे करू शकेन, पण जेव्हा मला रेकॉर्डबद्दल कळलं तेव्हा मी सराव करायला सुरुवात केली आणि अखेर हा नवा विक्रम माझ्या नावावर झाला. यासाठी काही विशेष तयारी करण्याची मला गरज वाटली नाही. आता मी हे आरामात करू शकते. केल्सीच्या नावे पायाचा पंजा मागून पुढे फिरवण्याचा विक्रम महिला गटात आहे. तर पुरुष गटात अमेरिकेच्या आरोन फोर्डच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. जो त्याचे पाय 173.03 अंशांपर्यंत फिरवू शकतो. आश्चर्य! खरंच दगडालाही फुटतो ‘मायेचा पाझर’; होतात प्रेग्नंट, देतात मुलांना जन्म केल्सीच्या या अनोख्या कौशल्याचा फायदा तिला आणखी एका कामासाठी होतो. आईस स्केटिंगमध्ये तिला हे खूप उपयोगी पडतं, असं ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.