दगड निर्जीव असतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकत नाही. पण अशाच दगडाबाबत अजब दावा केला जातो. काही दगड प्रेग्नंट होतात आणि ते आपल्या मुलांना जन्मही देतात. या अजब दाव्याला शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे.
हे दगड स्वतः नव्या दगडाची निर्मिती करतात. ते मोठे होतात आणि जागाही बदलतात. लोक या दगडांना डायनासोरची अंडी, जीवाश्म, चमत्कारी दगड मानतात.
शास्त्रज्ञांच्या मते, हा विचित्र दगड मानवांपेक्षाही खूप जुना आहे. जवळपास 5.3 दशलक्ष वर्षांआधीचा. भूकंपामुळे यांच्या जागेत बदल झाले. प्राचीन काळात तो समुद्रात असावा.
या दगडाचं नाव आहे ट्रॉव्हेंट्स. संशोधकांच्या मते, दर 1,000 वर्षांत ट्रोवेंट्स 1.5 से 2 इंच वाढतो. या दगडांच्या वाढत्या आकारामुळे ते मुलांना जन्म देतात असं म्हणतात.
याच्या आत खनिज पदार्थ असतात. या खनिज दगडात असे रासायनिक घटक असतात ज्यांच्यातील प्रतिक्रियेमुळे दगडांचा आकार वाढतो. या दगडातून सिमेंटसारखा एक पदार्थ निघतो. जेव्हा पाऊस होतो, तेव्हा हा पदार्थ बाहेर पडतो.
हा खास ट्रोवेंट्स दगड रोमानियाच्या वाल्सी काउंटीमधील कोस्टेस्टी गावातील वाळूच्या खाणीत खूप सापडचतो. आता युनेस्कोने दगडांचा गा भाग संरक्षित केला आहे.